जाहिरात
मराठी बातम्या / Viral / सेल्फी विथ मगर! सर्वात खतरनाक Selfie घेण्याचा तरुणांचा प्रयत्न; मगरीसमोरच झोपले आणि...

सेल्फी विथ मगर! सर्वात खतरनाक Selfie घेण्याचा तरुणांचा प्रयत्न; मगरीसमोरच झोपले आणि...

मगरीसोबत सेल्फी.

मगरीसोबत सेल्फी.

ज्या मगरीसमोर जाण्याची हिंमत प्राण्यांचीही होत नाही, तिच्यासमोर जाऊन तरुणांनी सेल्फी घेण्याची डेअरिंग केली.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 23 फेब्रुवारी : मगर जिच्यासमोर येण्याची हिंमत भलेभले प्राणी करत नाही. वाघ, सिंह, बिबट्या असे खतरनाक प्राणीही मगरीला घाबरतात. हे शक्तिशाली प्राणीही मगरीच्या तावडीत सापडले तर त्यांची सुटका शक्यच नाही. त्यांची शिकार झालीच समजा. अशा मगरीशी कोण बरं पंगा घेईल. पण दोन तरुणांनी मात्र असा मूर्खपणा केला. त्यांनी मगरीसोबत सेल्फी घेण्याची डेअरिंग केली. त्यासाठी ते तिच्यासमोरच झोपले. त्यानंतर असं घडलं की… सेल्फीसाठी काही लोक काहीही करू शकतात, कोणत्याही थराला जाऊ शकतात, याचंच हे एक उदाहरण. तरुणांना मगरीसोबत सेल्फी घेण्याची हौस आली आणि त्या नादात त्यांनी स्वतःला मृत्यूच्या दारासमोरच ठेवलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी जे कृत्य केलं ते पाहून सर्वांना घाम पुटला आहे. …जेव्हा वाघाला घाबरून पर्यटक ओरडले ‘हाड हाड’; पुढे काय घडलं पाहा VIDEO

@touronsofyellowstone ट्विटर अकाऊंटवर ह फोटो पोस्ट करण्यात आला आहे. जो अमेरिकेच्या फ्लोरिडातील एवरग्लेड नॅशनल पार्कमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. या फोटोत जंगतालून जाणारा एक रस्ता दिसतो आहे. ज्यावर एक मगर आहे आणि तिच्यासमोर रस्त्यावर दोन तरुण झोपले आहेत. त्यांच्यासमोर एक महिला उभी राहून त्यांचा फोटो काढते आहे. हे दोघंही तरुण मागे असलेल्या मगरीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

हा फोटो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कदाचित त्यांना मगर किती वेगाने धावून हल्ला करू शकते याची कल्पना नसेल, अशा जीवासमोर जाणं म्हणजे त्यांना भोजन देणं असंच आहे, इतका मूर्खपणा याआधी कधीच पाहिला नव्हता. हा वन्यप्राण्यांचा अपमान आहे, अशा कमेंट येत आहेत. तर एका युझरने जरी मगरीने त्यांचं डोकं खाल्लं तरी तिला त्यात काही मिळणार नाही कारण यांना मेंदूच नाही आहे, अशीही प्रतिक्रिया दिली आहे.

आश्चर्य! आकाशातून जमिनीवर टपटप पडले मासे; इथं चक्क माशांचा पाऊस, पण कसा?

तुमची या सेल्फी विथ मगरीचा फोटो पाहून काय वाटलं, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात