JOIN US
मराठी बातम्या / Viral / Wild Life : मगर पकडणार इतक्यात हरणाने पलटला गेम... शिकारीचा थरार कॅमेरात कैद

Wild Life : मगर पकडणार इतक्यात हरणाने पलटला गेम... शिकारीचा थरार कॅमेरात कैद

पाण्यातून हरिण आपले प्राण वाचवताना दिसत आहे. तर मगर आपली शिकार पकडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 फेब्रुवारी : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात जंगलाशी संबंधीत व्हिडीओ पाहायला अनेकांना आवडतात. जंगलातील प्राण्यांचे काही व्हिडीओ हे खरोखरंच खूप मनमोहक आणि सुंदर असतात. तर काही व्हिडीओ हे शिकारीच्या थराराचे असतात. सध्या अशाच एका शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे. जो खरोखर हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. हा व्हिडीओ हरिण आणि मगरीशी संबंधीत आहे. हा शिकारीचा थरारक व्हिडीओ आहे. पाण्यातून हरिण आपले प्राण वाचवताना दिसत आहे. तर मगर आपली शिकार पकडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. हे ही पाहा : हे ही पाहा : Video Viral : शिकार समजून बिबट्याने पकडली स्वत:चीच शेपटी, पुढे जे घडलं ते… जसा सिंह जंगलाचा राजा आहे. तसंच मगरीचं देखील पाण्यात वर्चस्व आहे. त्यामुळे पाण्यात जाताना किंवा पाणी पिताना प्राण्यांना सावध राहावं लागतं, कारण मगर कधी दबक्या पावलांनी कोणाचा खेळ खल्लास करेल याचा नेम नाही. अशातच एका मगरीच्या हाती हरिण लागलं आहे. हा व्हिडीओत नदीच्या पाण्यात हरिण पळताना दिसत आहे आणि त्याच्या मागे मगर देखील पळत असल्याचे तुम्ही पाहू शकता. पाण्याच्या इतक्या मध्यभागी हरिण कसा आला? हे माहित नाही. पण हरिण आपले प्राण वाचवण्यासाठी 200% प्रयत्न करतोय हे नक्की. हा व्हायरल व्हिडीओ पाहताना तुम्ही श्वास रोखून पाहाल की पुढे नक्की काय होणार आहे. कारण इतक्या पाण्यात मगरी कधी आणि कुठुन वार करेल याचा नेम नाही.

व्हिडीओत तर एकदा मगर हरणाच्या खुपच जवळ येते. तेव्हा असं वाटतं की आता हरणाचं काही खरं नाही. पण पुन्हा हरिण खूपच लांब उडी मारतो आणि पुढे पळतो. अखेर हरिण कसा बसा नदीच्या काठावर पोहोचतो आणि तेथून लांब उड्या मारत धुम ठोकतो. ज्यामुळे मगरीला त्याला पकडता येत नाही.

हा व्हिडिओ युट्यूब चॅनल लेटेस्ट साइटिंग्जवर ३१ जानेवारीला शेअर करण्यात आला आहे. या आतापर्यंत लोखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी यावर कमेंट्स देखील केले आहेत. लोकांनी हरणाच्या जगण्याच्या कौशल्याचे कौतुक केले आहे, तर काही लोकांना मगर आता उपाशी राहिल याची चिंता लागून राहिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या