असे जीव ज्यांचं रक्त लाल नाही

माणसाचं रक्त हे लाल आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीय, पण असे जीव आहेत, ज्यांचं रक्त लाल नाही हे माहितीय का?

या प्राण्यांचं रक्त हे लाल नाही, तर हिरवा, निळा आणि पिवळा आहे

सरडा
न्यू गिनिया नावाच्या सरड्याचे रक्त हिरवे असते, त्यामुळे त्याची जीभ आणि स्नायू देखील हिरवे राहतात

आइसफिश
हे मासे अंटार्क्टिकाच्या खोलवर आढळतात. जिथे तापमान खूप थंड असते. या आईसफिशचे रक्त रंगहीन आहे, त्यामुळे ते पारदर्शक आहे

म्हणजेच या माशाच्या रक्तात हिमोग्लोबिन आणि हिमोसायनिन नाही

ऑक्टोपस
हा एक समुद्री प्राणी आहे, ज्याला अनेक देशांमध्ये खाल्ले जाते. ऑक्टोपसचे रक्त लाल नसून निळे असते

ऑक्टोपसच्या शरीरात तांब्याचे (कॉपर) प्रमाण खूप जास्त असते. यामुळे त्याचे रक्त निळे असते

पीनट वॉर्म
ही एक अळी आहे, जिचं रक्त जांभळ्या रंगाचे आहे. जेव्हा हेमोएरिथ्रीन नावाचे प्रथिने शरीरात ऑक्सिडाइझ केले जाते तेव्हा त्याचा रंग जांभळा किंवा कधीकधी गुलाबी होतो

सी-कुकुम्बर
हा प्राणी सी-कुकुम्बर या नावाने प्रसिद्ध आहे. याच्या रक्ताचा रंग पिवळा आहे. या प्राण्याच्या रक्ताचा रंग पिवळा का आहे हे आजपर्यंत शास्त्रज्ञांना सांगता आलेलं नाही