JOIN US
मराठी बातम्या / Viral / सोनं-चांदी-पैसे नव्हे, टोमॅटोशी तुला; कुटुंबाने लेकीच्या वजनाइतके टोमॅटो केले दान

सोनं-चांदी-पैसे नव्हे, टोमॅटोशी तुला; कुटुंबाने लेकीच्या वजनाइतके टोमॅटो केले दान

एका जोडप्याने त्यांच्या मुलीची तुला करून तिच्या वजनाइतके टोमॅटो देवीला अर्पण केले.

जाहिरात

मुलीची टोमॅटो तुला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 18 जुलै : सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले असताना आंध्र प्रदेशातल्या एका जोडप्याने नुकलम्मा देवीला 51 किलो टोमॅटो अर्पण केले. या जोडप्याने त्यांच्या मुलीची तुला करून तिच्या वजनाइतके टोमॅटो देवीला अर्पण केले. अन्नदानाच्या माध्यमातून हे टोमॅटो भक्तांपर्यंत पोहोचावेत यासाठी ते मंदिराच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. जग्गा अप्पा राव आणि मोहिनी हे जोडपं अनाकापल्ले जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी राहतं. या जोडप्याला भविष्या नावाची एकुलती एक मुलगी आहे. शहरातल्या नुकलम्मा देवीच्या मंदिरात आपल्या मुलीचा तुलाभार (आपल्या मुलीच्या वजनाइतकं काही तरी देवीला अर्पण करणं) करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. रविवारी (१६ जुलै) हे तिघं मंदिरात गेले आणि तुला करून त्यांनी देवीला 51 किलो टोमॅटो अर्पण केले. सध्या खुल्या बाजारात टोमॅटोचे दर प्रति किलो 120 रुपयांच्या वर गेले आहेत. तुलाभाराच्या वेळी मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांसाठी हा आश्चर्यकारक प्रसंग होता. छंदातून जोपासल्या लोक संस्कृतीच्या खुणा; म्हैसूरमधल्या प्राध्यापकाने केला जुन्या वस्तूंचा संग्रह `आम्ही रोजच्या अन्नदानासाठी या टोमॅटोचा वापर करणार आहोत,` असं मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. `माझ्या पालकांच्या मनात तुलाभाराचा विचार आला, तेव्हा यासाठी टोमॅटो देण्याची सूचना मी केली. कारण ही भाजी सध्या खूप महाग आहे. आता अनेक भाविक रोजच्या अन्नदानावेळी जेवताना सर्वांत महाग भाजीचा आस्वाद घेऊ शकतील,` असं भविष्याने सांगितलं.

संबंधित बातम्या

दुसरीकडे, तेलंगणच्या आदिलाबाद जिल्ह्यामधल्या मावळा इथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44वर 22 लाख रुपये किमतीचे 18 टन टोमॅटो भरलेल्या ट्रकला पोलीस कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावं लागलं. या वाहनाच्या चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला टाळण्याचा प्रयत्न केला असता ट्रक उलटला. या ट्रकमधून प्रवास करणाऱ्या व्यक्ती वाहनाबाहेर पडून किरकोळ जखमी झाल्या आहेत. भार सहन न झाल्याने ट्रक उलटला. हे टोमॅटो नागरिकांनी पळवून नेऊ नयेत, यासाठी वाहनाच्या मालकाने पोलिसांशी संपर्क साधला. हायवे पॅट्रोलिंग पार्टीने या वाहनाला सुरक्षा पुरवली. PHOTOS : भद्राचलम इथे पारंपरिक भातलागवड सुरू, राम-सीता मातेच्या विवाहाशी आहे कनेक्शन `मावळा पोलीस स्टेशनचे चार पोलीस कर्मचारी आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं एक गस्तपथक वाहन मालकाच्या विनंतीवरून घटनास्थळी तैनात करण्यात आलं,` असं मावळाचे पोलीस उपनिरीक्षक विष्णुवर्धन यांनी सांगितलं. त्यानंतर ते सगळे टोमॅटो दुसऱ्या वाहनात भरण्यात आले. या अपघातात टोमॅटोंसह बॉक्सचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसल्याचं मालकाने सांगितलं. कर्नाटकातल्या कोलारमधून हा ट्रक दिल्लीला जात होता. तेव्हा हा अपघात झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या