JOIN US
मराठी बातम्या / Viral / 31 लाखाची हिऱ्याची अंगठी कमोडमध्ये गेली; महिलेनं थेट पोलीसच बोलावले, अन् मग...

31 लाखाची हिऱ्याची अंगठी कमोडमध्ये गेली; महिलेनं थेट पोलीसच बोलावले, अन् मग...

एका महिला कर्मचाऱ्याने अंगठी चोरून पर्समध्ये ठेवल्याची कबुली दिली. मात्र नंतर पोलिसांच्या भीतीने तिने क्लिनिकमध्ये असलेल्या वॉशरूमच्या कमोडमध्ये अंगठी टाकली होती.

जाहिरात

हिऱ्याची अंगठी कमोडमध्ये गेली (प्रतिकात्मक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद 04 जुलै : हैदराबादमधील स्किन आणि हेअर क्लिनिकमधून एक अजब घटना समोर आली आहे. या क्लिनिकच्या कर्मचार्‍यांनी एका महिला ग्राहकाची 30.69 लाख रुपये किमतीची हिऱ्याने जडवलेली अंगठी चोरली. पण शेवटी पकडलं जाण्याच्या भीतीने त्यांनी ती टॉयलेट कमोडमध्ये फेकली. पोलिसांनी प्लंबरच्या मदतीने कमोडला जोडलेल्या पाइपलाइनमधून अंगठी जप्त केली आणि नंतर चोरीच्या आरोपाखाली आरोपी महिला कर्मचाऱ्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात एक महिला शहरातील पॉश भाग असलेल्या ज्युबली हिल्स येथील हेअर अँड स्किन क्लिनिकमध्ये गेली होती. चेकअपदरम्यान महिलेनं तिची अंगठी समोरच्या टेबलावर काढून ठेवली होती. यानंतर महिला अंगठी उचलण्यास विसरली आणि तिच्या घरी पोहोचली. आपली अंगठी क्लिनिकमध्ये विसरल्याचं लक्षात येताच तिने लगेचच क्लिनिकमध्ये धाव घेत कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. पण कोणी काही सांगितलं नाही. नंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. Oh no! BF ने घातली तब्बल 2 लाख रुपयांची अंगठी; दुसऱ्या दिवशीच GF वर बोट कापण्याची वेळ पोलिसांनीही कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पण तरीही कोणी काहीच सांगितलं नाही. यानंतर पोलिसांनी कडक चौकशी केली असता एका महिला कर्मचाऱ्याने अंगठी चोरून पर्समध्ये ठेवल्याची कबुली दिली. मात्र नंतर पोलिसांच्या भीतीने तिने क्लिनिकमध्ये असलेल्या वॉशरूमच्या कमोडमध्ये अंगठी टाकली होती. कमोडमधील मौल्यवान अंगठी टाकल्याची माहिती ऐकून पोलिसांना धक्काच बसला. तडकाफडकी प्लंबर बोलावून पाइपलाइन उघडून अंगठीचा शोध सुरू करण्यात आला. अखेर ही सर्व मेहनत यशस्वी झाली आणि प्लंबरला अंगठी मिळाली..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या