Home /News /viral /

Oh no! BF ने घातली तब्बल 2 लाख रुपयांची अंगठी; दुसऱ्या दिवशीच GF वर बोट कापण्याची वेळ

Oh no! BF ने घातली तब्बल 2 लाख रुपयांची अंगठी; दुसऱ्या दिवशीच GF वर बोट कापण्याची वेळ

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

बॉयफ्रेंडने दिलेल्या ज्या अंगठीमुळे तिच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याच अंगठीमुळे तिचा जीव धोक्यात आला.

    लंडन, 04 जुलै : आपल्या बॉयफ्रेंडने आपल्याला एक्सपेन्सिव्ह रिंग घालून प्रपोज करावं किंवा होणाऱ्या नवऱ्याने साखरपुड्याला महागडी अंगठी घालावी, असं बहुतेक तरुणींना वाटतं (Couple Engagement Ring). यूकेतील एका महिलेचं हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं. तिच्या बॉयफ्रेंडने तिला तब्बल 2 लाख रुपयांची अंगठी घालून तिला प्रपोज केलं. पण दुसऱ्याच दिवशी तरुणीचं ते बोट कापण्याची वेळ ओढावली  (Dangerous Engagement Ring). साऊथ ईस्ट लंडनच्या बेकिनहममध्ये राहणाऱ्या 30 वर्षांची पेरिएसा ओरोमेलासाठी (Periesa Oromé) तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षणच तिच्या जीवावर बेतायला आला.  कित्येक वर्षांच्या डेटिंगनंतर तिचा बॉयफ्रेंड विलिस ओरोमेने तिला लग्नासाठी प्रपोज केलं. त्याने  दोन लाख रुपयांची अंगठी तिच्या बोटात घातली. त्यानंतर तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. पण हीच अंगठी या कपलसमोर मोठं संकट उभं करेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. दुसऱ्या दिवशीच अंगठीमुळे तरुणीची इतकी अवस्था भयंकर झाली. तिचं बोट कापण्याची वेळ आली. हे वाचा - वडील शेवटच्या घटका मोजत असतानाच लेकीचं रुग्णालयात धक्कादायक कृत्य; तरीही होतंय कौतुक दुसऱ्या दिवशी पेरिएसा उठली तेव्हा तिला तिच्या बोटात काहीच संवेदना जाणवत नव्हत्या. तिने अंगठी काढण्याचा प्रयत्न केला. पण ती बोटात इतकी घट्ट बसली होती की काही केल्या निघेनाच. तिने बोटातून अंगठी काढण्याचे वेगवेगळे उपायही यूट्युबवर पाहिले. अगदी साबणापासून बर्फापर्यंत सर्वकाही तिने वापरून पाहिलं. पण तिचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. हळूहळू तिचं बोट सुजू लागलं आणि शेवटी बोटाचा रंगही बदलला. तिचं बोट जांभळं पडू लागले. त्यावेळी ती घाबरली आणि तिने फायर ब्रिगेडलाच फोन केला. त्यांनी कटरच्या मदतीने तिच्या बोटातील अंगठी कापून काढली. अंगठी कापून काढताच पेरिएसाच्या त्या बोटातील रक्तप्रवाह सुरळीत झाला आणि बोट नीट झालं. हे वाचा - 12 व्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होती महिला; मात्र बसला झटका! या कपलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लग्न केलं. आपल्या लग्नाआधी झालेल्या हा आपला विचित्र अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला.  नंतर कोणतेही अतिरिक्त पैसे न घेता या कपलला अंगठीचा आकार मोठा करून मिळाला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Lifestyle, Ring, Viral

    पुढील बातम्या