सोर्स : गुगल
मुंबई : देशाचा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वीच पार पडला, ज्यानंतर प्रत्येक राज्य देखील त्यांचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यासगळ्यात छत्तीसगडच्या अर्थसंकल्पाकडे सध्या सगळ्यांचं लक्ष वळलं आहे. यामागचं कारण अर्थसंकल्प नाही तर त्यासाठी वापरली गेलेली बॅग ठरली आहे. आता असं का? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, मग जाणून घेऊ. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी विधानसभेत 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात प्रामुख्याने सर्व विभागांना विचारात घेऊन कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आधारित छत्तीसगड मॉडेलमधील उद्दिष्टे पूर्ण करण्याचे ठरवले होते. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची ब्रीफकेस चांगलीच चर्चेत होती, ज्यावर सुरगुजा जिल्हा मुख्यालय अंबिकापूरच्या शहरी गोठणची झलक पाहायला मिळाली. बांगलादेशात रेल्वेचे तीन ट्रॅक का असतात? यामागचे कारण जाणून वाटेल आश्चर्य मुख्यमंत्र्यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प कागदपत्रांसह सादर केलेला सूटकेस अंबिकापूर शहरातील घुत्रापारा गोठाणमध्ये बनवण्यात आली होती. छत्तीसगढ सरकारच्या महत्त्वाकांक्षी गोधन न्याय योजनेने राज्यातच नव्हे तर देशात आपला गौरव उंचावला आहे. या अंतर्गत शेण, ताग इत्यादींचा वापर करून ही खास ब्रीफकेस बनवण्यात आली. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी ही ब्रीफकेस राज्यप्रमुख भूपेश बघेल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. अंबिकापूर महानगरपालिकेच्या आयुक्त प्रतिष्ठा ममगाई यांनी सांगितले की, “आमच्या शहरासाठी, महानगरपालिकेसाठी आणि आमच्या भगिनींसाठी ही अभिमानाची बाब आहे की मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी गोठणमध्ये बनवलेल्या बॅगचा वापर केला.” त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. येत्या काळात ही सुटकेस एम्पोरियममध्येही विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.
ममगाई यांनी सांगितले की, या सुटकेसमध्ये शेणखत वापरण्यात आले आहे, ते फक्त गौठाणचे आहे. यासोबतच वापरण्यात येणारा पेंटही शेणापासून बनवला जातो. राधेश्याम आर्टिस्टने रंगवलेली ब्रीफकेस. ही बॅग माती, ताग आणि शेणापासून बनवली जाते. लवकरच ही बॅग गोधन एम्पोरियममध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांचे हे पाऊल गौठाणमध्ये काम करणाऱ्या ताई आणि स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या ताईंना प्रोत्साहन देणारे ठरेल, असेही ते म्हणाले.