JOIN US
मराठी बातम्या / Viral / मांजरीने उंदराला जबड्यात पकडून कोपऱ्यात नेलं, पण पुढे जे केलं ते पाहून डोळेच विस्फारतील, Video

मांजरीने उंदराला जबड्यात पकडून कोपऱ्यात नेलं, पण पुढे जे केलं ते पाहून डोळेच विस्फारतील, Video

व्हायरल व्हिडीओमध्ये एका मांजरीने जबड्यात उंदीर धरलेला दिसत आहे. आता या उंदराचा शेवट जवळ आला आहे, असं तुम्हाला वाटेल. पण…

जाहिरात

मांजरीने उंदरासोबत केलं थक्क करणारं काम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 22 मे : मांजर आणि उंदीर यांच्यातील वैर जगाला माहीत आहे. मांजरी उंदराची शिकारी करून त्याला खाण्यासाठी त्याच्या मागे धावताना दिसतात. पण आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, मांजरीच्या वागण्याने केवळ उंदीरच गोंधळला नाही तर नेटिझन्सही क्लिप पाहिल्यानंतर चक्रावून गेले आहेत. खरंतर उंदराला पाहून मांजर असं कृत्य करते, जे पाहिल्यानंतर तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. क्रूरतेचा कळस! मोरासोबत तरुणाचं संतापजनक कृत्य; पोलीसही शोधात, सापडला तर… व्हायरल व्हिडीओमध्ये एका मांजरीने जबड्यात उंदीर धरलेला दिसत आहे. आता या उंदराचा शेवट जवळ आला आहे, असं तुम्हाला वाटेल. पण पुढच्याच क्षणी असं काही घडतं, जे पाहून तुमचे डोळे विस्फारतील. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की मांजर उंदराला जेवणाच्या ताटाच्या जवळ घेऊन जाते आणि तिथेच ठेवते. यानंतर दोघेही एकत्र बसून मेजवानीचा आनंद घेतात. तुम्ही यापूर्वी असं दृश्य क्वचितच पाहिलं असेल.

संबंधित बातम्या

मांजरीचं हे चकित करणारं वर्तन पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @family.cat18 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 10 मे रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत सुमारे 75 हजार लोकांनी या क्लिपला लाईक केलं आहे, तर डझनभर लोकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांना हा व्हिडिओ पाहून टॉम अँड जेरी आठवले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक वापरकर्ता म्हणाला, मी अनेक मांजरींना उंदराला आपलं भक्ष्य बनवण्यापूर्वी त्यांच्याशी खेळताना पाहिलं आहे. पण हे त्याहूनही थक्क करणारं आहे. त्याचवेळी, आणखी एका युजरने लिहिलं आहे की, मांजरीच्या या कृत्याने उंदीरही गोंधळला असावा. आणखी एका यूजरने कमेंट केली आहे, हा व्हिडिओ मला ‘टॉम’ची आठवण करून देत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या