भोपाळ, 21 मे : मोर हा राष्ट्रीय पक्षी. पण अशा मोरासोबत एका तरुणाने क्रूर कृत्य केलं आहे. त्याचा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. आता हा तरुण पोलिसांच्या टार्गेटवर आहे. जर तो सापडला, तुम्हाला दिसला तर त्याला बिलकुल सोडू नका. थेट पोलिसांच्या तावडीत द्या. तरुणाने मोरासोबत केलेलं कृत्य पाहून तुमचाही राग राग होईल. मध्य प्रदेशातील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुण आणि तरुणी बसले आहेत. त्यांच्यासमोर मोर आहे. तरुणाने मोराला हातात धरलं आहे आणि तो त्याच्यासोबत काही तरी करताना दिसत आहे. तुम्ही व्हिडीओ पाहाल तर तुम्हाला धक्काच बसेल. हा तरुण त्या मोराची पिसं काढताना दिसतो आहे. हातांनीच तो त्या मोराच्या शरीरावरील पिसं उपटून काढतो आहे. बरीच पिसं जमिनीवर पसरलेली दिसत आहेत आणि उरलेली पिसं तो काढतो आहे. एका सापाची एंट्री अन् 16000 घरात एकाच वेळी असं काही घडलं की सर्वांची झोप उडाली असं करताना तरुणाच्या चेहऱ्यावर कोणतीच शरम दिसत नाही. तो आनंदाने हसतो आहे. मोरासोबत असं करताना त्याला आनंद होतो आहे. त्याच्याशेजारी बसलेली तरुणीही त्याला साथ देते आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आहे आणि त्यांचा शोध सुरू केला आहे. भारतात मोराला इजा पोहोचवल्यास 7 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आहे. कारण मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि त्याला वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत संरक्षण आहे. जर तुम्हालाही कुणी मोराला त्रास देताना, त्याचा छळ करताना किंवा असं काही कृत्य करताना दिसलं तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता. हरणाच्या शिकारीसाठी वाघाची धडपड; पाण्यातही उतरला पण हाती आला ‘भोपळा’, हा VIDEO पाहाच या घटनांची नोंद करणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून अधिकारी कारवाई करू शकतील आणि मोरांचं संरक्षण करू शकतील.
#Bhopal: A man stripping the feathers off a peacock in #MadhyaPradesh's Katni has created a furore on social media.
— Shubham Rai (@shubhamrai80) May 21, 2023
Police have identified the accused and say they are looking for the accused. pic.twitter.com/BI5jLQVmvS
@shubhamrai80 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.