मांजरीने घेतला किंग कोब्रासोबत पंगा
नवी दिल्ली 17 जून : साप हा असा जीव आहे, ज्याचा विचार करूनही थरकाप उडतो. तो समोर आला तर कोणालाही घाम फुटेल. सापांमध्येही किंग कोब्रा अतिशय धोकादायक मानला जातो. त्यात इतकं विष भरलेलं आहे की केवळ मानवच नाही तर इतर प्राणीही त्याच्याजवळ जाणं टाळतात. पण एका मांजरीने किंग कोब्राशी पंगा घेतला. इतकंच नाही तर त्याचा मार्ग अडवून त्याला अनेक वेळा आपल्या पंजाने मारलं. यानंतर सापाने काही विचित्र प्रतिक्रिया दिली. दोघांमधील फाईटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साप-मांजराच्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक किंग कोब्रा रस्ता ओलांडताना दिसत आहे. साप रस्ता ओलांडू लागताच एक मांजर त्याच्या मागे येते. ती सापाची शेपटी पकडू लागते. सुरुवातीला साप त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण मांजर त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत राहाते, तेव्हा तो मागे वळून मांजराला चावण्याचा प्रयत्न करतो. फिरत्या पंख्यात अडकलेला विषारी साप खाली बसलेल्या व्यक्तीच्या अंगावर पडला अन्…थरकाप उडवणारा VIDEO साप चावण्यापूर्वीच चपळ मांजर मागे सरकते, त्यामुळे सापाचा हल्ला निरुपयोगी ठरतो. यासोबतच मांजर आपल्या पंज्याने सापाला जोरात मारते. मांजरीने मारताच तो कोणतीही प्रतिक्रिया न देता पुढे पळू लागतो, पण मांजर मात्र त्याचा पाठलाग करत राहते. वाटेत ती 3-4 वेळा त्याचा मार्ग अडवते आणि साप फणा पसरवताच ती त्याला जोरात मारते. इथे क्लिक करून पाहा Video मांजराचा सामना कसा करावा हे सापाला समजत नाही. अशा परिस्थितीत, तो पटकन रस्ता ओलांडतो आणि झुडपात लपण्याचा प्रयत्न करतो, परंतु मांजर त्याची पाठ सोडत नाही. तो झुडपात लपेपर्यंत तिने आणखी 3-4 वेळा त्याच्यावर हल्ला केला असेल. रस्त्याच्या मधोमध मांजर आणि सापाची ही अनोखी झुंज पाहण्यासाठी अनेकजण जमतात. त्यातील काहींनी या लढतीचा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सवर शेअर करण्यात आला आहे, जो सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज आणि लाईक्स मिळत आहेत. त्यात मांजरीची हिंमत पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एका युजरने म्हटलं की, मांजरीने ज्या पद्धतीने कोब्राची अवस्था केली ते पाहून मजा आली.