JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral video : सुसाट कारनं आधी बाईक नंतर विद्यार्थ्यांना उडवलं, पाहा थरारक VIDEO

Viral video : सुसाट कारनं आधी बाईक नंतर विद्यार्थ्यांना उडवलं, पाहा थरारक VIDEO

कारच्या धडकेत विद्यार्थिनी 15 फूट उंच उडाली आहे. ही घटना रस्त्यावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

जाहिरात

कर्नाटकात भीषण अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायचूर, 27 जुलै : भरधाव कारने आधी दुचाकीस्वाराला आणि नंतर वेगावर नियंत्रण न आल्याने विद्यार्थ्यांना फरफटत नेल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. कारच्या धडकेत विद्यार्थिनी 15 फूट उंच उडाली आहे. ही घटना रस्त्यावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कर्नाटकातील रायचूर इथे हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. ज्यात शहरातील रेल्वे स्थानकाजवळील आंबेडकर सर्कल इथे एका भरधाव गाडीने विद्यार्थ्यांना धडक दिली. गाडीने धडक देताच 15 फूट उडून विद्यार्थिनी खाली पडली.

एवढ्या भीषण अपघातानंतरही या मुलीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. दुचाकीस्वार कारला धडकल्याने हा अपघात घडला, त्यामुळे दुचाकीस्वाराचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

आवडते गाणे न वाजवल्याचा राग, बारमध्ये गोंधळ घालत कर्मचाऱ्याला मारहाण, CCTV फुटेज आलं समोर

यू-टर्न घेत असताना कारने बाईकला धडक दिली. त्याचवेळी कार चालकाने तेथून जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांनाही धडक दिली. या अपघातात एक विद्यार्थिनी दूरवर फेकली गेली. या अपघातात अन्य दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना 18 जुलै रोजी दुपारी घडल्याचं सांगितलं जात आहे.

टायर फुटला अन् तोल गेला; दोन तरुणांना चिरडत गेली कार, पाहा भयानक VIDEO

या घटनेचा व्हिडीओ अंगावर शहारे आणणारा आहे. ज्यामध्ये एक वेगवान पांढऱ्या रंगाची कार यू-टर्न घेऊन रस्त्याच्या पलीकडे येणाऱ्या दुचाकीला धडकते, त्यामुळे दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळतो आणि बाईकचंही नुकसान होतं. चालकाचं कारवर स्पीडमुळे नियंत्रण रहात नाही आणि पुढचा प्रकार घडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या