JOIN US
मराठी बातम्या / Viral / क्लच पेडलवर पाय ठेवून गाडी चालवली तर काय होतं? ही चुक तुम्ही तर करत नाही ना

क्लच पेडलवर पाय ठेवून गाडी चालवली तर काय होतं? ही चुक तुम्ही तर करत नाही ना

आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला गाडी चालवताना क्लचच्या योग्य वापराविषयी सांगणार आहोत, कारण बरेच लोक क्लच पेडलचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात, ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : अनेकवेळा काही गोष्टी आपल्या इतक्या नित्याच्या बनून जातात की आपण त्यामध्ये काही चुक करतोय का? असं आपल्याला जाणवत नाही. असं गाडी चालवताना देखील अनेकांसोबत होतं. प्रत्येकाची गाडी चालवण्याची आपली पद्धत असते, त्याप्रमाणे तो आपल्या कंफर्टने गाडी चालवतो. पण अनेक लोक दररोज गाडी चालवताना अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांच्या मायलेजवर परिणाम होतो, शिवाय गाडीच्या इंजिनवर देखील याचा परिणाम होतो. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला गाडी चालवताना क्लचच्या योग्य वापराविषयी सांगणार आहोत, कारण बरेच लोक क्लच पेडलचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात, ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. तुम्हाला देखील क्लच पेडल दाबून ठेवून गाडी चालवण्याची सवय असेल, तर चला जाणून घेऊ याचे परिणाम काय आहेत. आधी क्लच दाबून बाईक थांबवायची की फक्त ब्रेक मारायचा? गाडी चालवण्याची योग्य पद्धत कोणती? क्रॉस शाफ्ट खराब होते ट्रान्समिशनच्या आत क्रॉस शाफ्ट म्हणून ओळखले जाणारे लीव्हर आहे. क्लच पेडलवर सतत टाकलेला दबाव या लीव्हरच्या कार्यावर परिणाम करते. जेव्हा क्रॉस शाफ्ट खराब होतो तेव्हा पेडल्स खाली ढकलणे कठीण होऊ शकते. यामुळे तुम्हाला क्लच प्रेस करण्यात अडचण येते. क्लच पेडल खराब झाल्यामुळे गेअर बदलण्यात देखील अडचण येते.

क्लच प्लेट खराब होण्याची शक्यता वाढते क्लच प्लेट्सवर जास्त दाब असल्यामुळे ते लवकर झिजतात, त्यामुळे वाहनात जास्त गरम होण्याची समस्याही कायम राहते. मग क्लच प्लेट खराब झाल्यानंतर हजारो रुपयांचा खर्च होतो. मायलेजवर परिणाम क्लच पेडलवर पाय ठेवून गाडी चालवल्याने इंजिनवर दबाव येतो, त्यामुळेच वाहन कमी मायलेज देते. त्यामुळे अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच क्लच वापरण्याचा सल्ला दिला जातो. ऑफ-रोडिंग करताना ही चूक करू नका तुम्ही तुमची गाडी ऑफ-रोडवर नेत असाल तर तिथे क्लचचा योग्य वापर करा. ऑफ-रोडिंग टप्प्यात अनेक खडबडीत रस्ते असतात, जिथे चालकाला थोडी काळजी घेऊनच गाडी चालवावी लागते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या