मुंबई 19 मार्च : रस्त्यावरून चालताना वळू समोर येण्याचा मूर्खपणा अनेकजण करतात, त्यामुळे त्यांना दुखापत होऊन त्रास सहन करावा लागतो. पण काही धाडसी लोक वळूच्या लढाईच्या खेळात गंमत म्हणून उडी मारतात, ज्यात निश्चितच हा वळू अधिक भडकलेला असतो. बुल फाइट खूप धोकादायक असू शकतात, तरीही लोक मनोरंजनासाठी ते पाहण्यासाठी येतात आणि बरेच लोक इतरांच्या मनोरंजनासाठी या वळूंच्या रणांगणात उडी घेतात. असंच एका महिलेनं केलं, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बिबट्या दररोज शेतात येऊन करतो काय? शेतकऱ्याने CCTV पाहिला आणि त्याला धक्काच बसला अलीकडेच @earth.reel या Instagram अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला रागावलेल्या वळूच्या समोरासमोर येताना दिसत आहे. ज्याप्रमाणे सर्कस किंवा इतर खेळ दाखवले जातात, त्याचप्रमाणे अनेक देशांत लोक मोठ्या उत्साहाने बुल फाईट पाहायला येतात. यामध्ये माणसं फक्त गंमत म्हणून भडकलेल्या वळूसोबत सामना करतात आणि तरीही त्याच्या तावडीतून स्वतःला वाचवून दाखवतात.
व्हायरल व्हिडिओमध्येही हे घडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये बुल फाईटसाठीचं एक रिंगण दिसत आहे ज्याभोवती प्रेक्षक बसलेले आहेत. रिंगच्या आत काळ्या रंगाचा वळू आहे. एका बाजूला एक पुरुष उभा आहे तर दुसऱ्या बाजूला एक स्त्री उभी आहे. ती एक महिलाच आहे असा दावा करता येत नसला तरी एकंदरीत तिला पाहून हे स्पष्ट होतं की ती एक महिला आहे जी रिंगमध्ये त्या वळूचा सामना करण्यास तयार आहे. तिने हेल्मेट घातले आहे. इतक्यात वळू पायाने माती उडवतो आणि मग अचानक त्या महिलेकडे धावतो.
जेव्हा वळू आपल्या शिंगाने जोरदार हल्ला करतो आणि महिलेला हवेत फेकतो तेव्हा तिला पळण्यासाठीही वेळ मिळत नाही. वळूच्या हल्ल्यात ती प्रेक्षकांच्या दिशेने उडते आणि धाडकन खाली पडते. या व्हिडिओला 24 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं, की कृपया जनावरांना एकटं सोडा. तर एकाने आश्चर्यचकित होऊन विचारलं, की महिला असं का करत आहे? एकाने सांगितलं की तो जो कोणी आहे, त्याने कपड्यांखाली चांगलं पॅडिंग केलं आहे, याचा अर्थ तो त्यासाठी आधीच तयार होता.