सांडने केला भयानक हल्ला
नवी दिल्ली 11 मे : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. इथे बर्याचदा मजेदार आणि थरारक व्हिडिओ बघायला मिळतात. जे वापरकर्त्यांचं त्यांच्या मोकळ्या वेळेत भरपूर मनोरंजन करतात. आजकाल साहसी खेळांचे अनेक व्हिडिओ वापरकर्त्यांच्या पसंतीस उतरतात आणि व्हायरल होतात. हे व्हिडिओ सर्वांनाच आवडतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो काळजाचा ठोका चुकवणारा आहे. लिफ्टचा दरवाजा बंद होताच महिलेचं थरकाप उडवणारं कृत्य; भयानक घटनेचा हदारवणारा VIDEO स्पेनमधील बुल फाइट खेळाबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. यासोबतच युरोपातील काही देशांमध्ये लोक बैलांसोबत धोकादायक खेळ खेळताना दिसतात. जे पाहण्यासाठी तिथेही मोठी गर्दी जमते. अशाच एका स्टेडियममध्ये एक व्यक्ती भडकलेल्या बैलावर स्वार झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बैलाच्या पाठीवर स्वार झालेला व्यक्ती शेवटी जखमी होताना दिसत आहे.
सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेला व्हिडिओ यूजर्स शेअर करत आहेत. जो @clipsthatgohard नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बैलाच्या पाठीवर बसून त्यावर स्वार होताना दिसत आहे. बैल सतत हवेत उडी मारत त्या व्यक्तीला पाठीवरून पाडण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान ती व्यक्ती बेशुद्ध होऊन बैलाच्या पाठीवरून पडते. यानंतर बैल रागाने व्यक्तीवर हल्ला करताना दिसतो. बैल या व्यक्तीला पायाने चिरडताना दिसत आहे. शोच्या आयोजकांनी त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि बैलाला त्याच्यापासून दूर केलं आणि त्याला वाचवल्यानंतर बाहेर काढलं. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती एकदा पडल्यानंतर उठताना दिसत नाही. एका युजरने म्हटलं की, अशा प्रकारे बैल सवारी करणं चुकीचं आहे आणि ते क्रूरतेच्या श्रेणीत येतं. त्याचवेळी, असे खेळ आमच्या देशाची संस्कृती आणि परंपरा असल्याचे काहींचे म्हणणे आहे.