नवी दिल्ली 11 मे : जगभरात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे. त्याच वेळी, असेही काही लोक आहेत ज्यांच्यासाठी दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्या गोष्टी अगदी नवीन आहेत. अशा परिस्थितीत अनेक वेळा त्यांना या टेक्नॉलॉजी योग्य वापर करता येत नाही. काही प्रकरणांमध्ये त्यांना त्याचा फटकाही सहन करावा लागतो. सोशल मीडियावर नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला असंच दृश्य पाहायला मिळतं. शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती असणं हे सामान्य आहे. अशा परिस्थितीत या इमारतींपैकी एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लोक लिफ्टचा वापर करतात. या लिफ्ट लोकांसाठी जीवघेण्या ठरत असल्याचंही अनेकदा दिसून आलं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी यापूर्वी मोठमोठे अपघात झालेले पाहिले आहेत. अशाच एका व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ज्यामध्ये एक महिला पहिल्यांदा लिफ्टमध्ये जाते आणि घाबरल्यामुळे अपघाताची शिकार होताना दिसते. हे काय? 6 वर्षांच्या विद्यार्थ्याचं ड्रॉईंग पाहून शिक्षकांना फुटला घाम, बोलावली एमर्जन्सी मीटिंग व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये दोन महिला पाण्याच्या बाटल्यांचे पॅकेट घेऊन जाताना दिसत आहेत. यादरम्यान एक महिला नकळत लिफ्टच्या गेटवर ठेवलेले पॅकेट उचलते आणि आत टाकते. त्यामुळे लिफ्टचा दरवाजा बंद होऊन ती वरच्या दिशेने जाऊ लागतो. यामुळे घाबरलेल्या महिलेने वाटेतच लिफ्टचा दरवाजा उघडला आणि त्यातून खाली उतरण्यास सुरुवात केली. यादरम्यान महिला तिथे अडकलेली असतानाच लिफ्टचा दरवाजा बंद होत असल्याचं दिसतं.
But why? pic.twitter.com/MFeh1efRkc
— CCTV IDIOTS (@cctvidiots) May 9, 2023
व्हिडिओ पाहून अंदाज बांधता येतो की, लिफ्टचं गेट पुन्हा एकदा बंद झाल्यानंतर लिफ्ट सुरू होताच ती महिला अपघाताची शिकार होऊ शकते. ज्यामध्ये तिला खूप दुखापत होण्याची शक्यता आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो @cctvidiots नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियावर 9.2 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि व्हिडिओ पाहून सर्वजण आश्चर्यचकित होत प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं की, ‘मला तिच्यासाठी खूप वाईट वाटत आहे आणि मला आशा आहे की तिला फारशी दुखापत झालेली नसेल.