सांडचा व्यक्तीवर भयानक हल्ला
नवी दिल्ली 01 जून : सांड हा असा प्राणी आहे, ज्याला केव्हा राग येईल आणि कधी कोणाला मारेल हे सांगणं कठीण आहे. अनेकदा याचा प्रत्यय देणाऱ्या घटनाही समोर येतात. आता असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये दिसतं, की हा प्राणी विनाकारण एका व्यक्तीला कसं उचलून फेकून देतो. जोपर्यंत त्या व्यक्तीला काही समजतं, तोपर्यंत तो सांड आपलं काम करून तिथून निघून जातो. हा हल्ला बघून नेटकऱ्यांच्या अंगावरही काटा आला. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये एक व्यक्ती रस्त्यावरील नाली साफ करताना दिसत आहे. त्याच वाटेवरून एक सांड हळूहळू येत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. परंतु प्राण्याच्या हावभावावरून असं वाटत नाही की, तो या व्यक्तीला काही करणार आहे. याच कारमामुळे ती व्यक्तीही नाली साफ करत राहते. मात्र पुढच्या क्षणी सांड जे काही करतो ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा प्राणी शेवटच्या क्षणी व्यक्तीला उचलून फेकून देतो. Viral Video : फोटोशूट करणाऱ्या तरुणीच्या अंगावर येऊन बसला भयानक वाघ प्राण्याच्या हल्ल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर @ZimDaily नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 22 मे रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 71 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर साडेपाच हजारांहून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. याशिवाय 62 हजार लोकांनी व्हिडिओ लाइकही केला आहे.
कमेंट करताना एका यूजरने लिहिलं आहे की, “बिचारा माणूस… कोणत्याही चिथावणीशिवाय सांडचा बळी ठरला.” दुसर्या युजरने लिहिलं आहे की, त्या व्यक्तीलाही प्रश्न पडत असेल की त्याने मला का मारलं, मी तर काहीच केलं नाही. आणखी एका युजरने लिहिलं आहे की, सांडला पाहताच माणसाने तिथून दूर जायला हवं.