JOIN US
मराठी बातम्या / Viral / ती लढली म्हणून जिवंत राहिली, सिंहिणींच्या कळपात सापडलेल्या म्हशीचा धक्कादायक प्रकार, पाहा Video

ती लढली म्हणून जिवंत राहिली, सिंहिणींच्या कळपात सापडलेल्या म्हशीचा धक्कादायक प्रकार, पाहा Video

सिंहिणीला पाहून एका म्हशीने भलतंच शौर्य दाखवलं आहे. तिचं पुढे काय झालं? पाहा व्हिडीओ

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मे : वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मजेदार क्षणांचे असतात, तर कधी धक्कादायक शिकारीचे तर काही व्हिडीओ हे सर्वांनाच आश्चर्यचकीत करतात. सध्या समोर आलेला व्हिडीओ देखील असाच आहे. हा व्हिडीओ सिंहिण आणि म्हशीशी संबंधीत आहे. आपल्याला तर हे माहित आहे की सिंहिण असोत किंवा सिंह किंवा मग वाघ, बिबट्या, चित्ता हे सगळेच शिकारी प्राणी खूपच धोकादायक असतात. त्यांच्या हातातून एखादी शिकार सुटणे हे क्वचितच पाहायला मिळते. ज्यामुळे यांना लांबून पाहाताच इतर प्राणी पळून जातात. पण असं असलं तरी देखील एका म्हशीने मात्र भलतंच शौर्य दाखवलं आहे. वासराला वाघ पकडणार इतक्यात गायीची एन्ट्री, 10 सेकंदात पलटला संपूर्ण गेम, पाहा Video Earth.reel या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका म्हशीने सिंहीणांना असा धडा शिकवला, की पाहणारे लोक थक्क झाले. आश्चर्य म्हणजे तेथे एक सिंहिण किंवा सिंह नाही तर त्यांचा संपूर्ण कळप होता. म्हशीने कळपात बसलेल्या सिंहीणांवर हल्ला केला आणि एका सिंहिणीला आपल्या शिंगाने उचलून असे मारले की घाबरून म्हशीला सामोरे जाण्याची हिंमत दुसऱ्या कोणत्या सिंहिणीची झाली नाही. संपूर्ण कळप हा फक्त एका म्हशीला घाबरला आणि यासाठी कारणीभूत होता म्हशीचा आत्मविश्वास. परिस्थिती पाहून हार न मानता ती लढली म्हणून जिवंत राहिली एक सिंह आणि 14 म्हशी, कोणाची होईल शिकार? Video पाहा आणि तुम्हीच ठरवा एका एकट्या म्हशीने सिंहिणींच्या कळपावर हल्ला केला सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सिंहीणी कळपात बसलेली दिसत आहे. तेवढ्यात एक म्हैस वेगाने धावत आली आणि तिने कळपात बसलेल्या सिंहिणींवर हल्ला केला आणि समोर बसलेल्या सिंहिणीला आपल्या शिंगांमध्ये उचलून अशा प्रकारे मारले की तिची अवस्था पाहून बाकीच्या सिंहिणींनी पुढे जाण्याची हिंमतच केली नाही.

संबंधित बातम्या

त्यावेळी एक सिंहीण म्हशीच्या रागाची शिकार होत राहिली आणि बाकीच्या सिंहीणी हे सगळं फक्त पाहातच राहिल्या. तसे पाहाता हे दृश्य क्वचितच कधी पाहायला मिळेल असंच आहे, ज्यामुळे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या