JOIN US
मराठी बातम्या / Viral / लग्नाचे विधी सुरू असताना नवरदेवाचा चेहरा पाहताच हादरली नवरी; पोलिसांत पोहोचलं प्रकरण

लग्नाचे विधी सुरू असताना नवरदेवाचा चेहरा पाहताच हादरली नवरी; पोलिसांत पोहोचलं प्रकरण

एका गावात तेव्हा गोंधळ उडाला जेव्हा नवरीच्या घरच्यांनी दारात आलेली वरात परत पाठवली. नवरदेव आणि वरातीतील लोकांना मारहाणही करण्यात आली.

जाहिरात

नवरदेवाचा चेहरा पाहताच हादरली नवरी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा 30 जून : आपल्या लग्नाचा दिवस हा प्रत्येकासाठी अतिशय खास आणि आनंदाचा असतो. नवरी आणि नवरदेव या दिवसाची आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र काहीवेळा लग्नातच ऐनवेळी असं काही घडतं की सगळेच हैराण होतात. असंच एक प्रकरण बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून समोर आलं आहे. यात जिल्ह्यातील एका गावात तेव्हा गोंधळ उडाला जेव्हा नवरीच्या घरच्यांनी दारात आलेली वरात परत पाठवली. नवरदेव आणि वरातीतील लोकांना मारहाणही करण्यात आली. गावातील इतर लोकांनी नवरदेव आणि वरातातील पाहुण्यांना वाचवलं. गावात आलेले पोलीस नवरदेवासह वरातीतील सगळ्या लोकांना पोलीस ठाण्यात घेऊन आले. तेव्हा समजलं, की नवरदेव म्हणून आलेला तरुण वेगळाच होता. तरुणीचं ज्या व्यक्तीसोबत लग्न ठरलं होतं, तो हा नव्हताच. त्याच्या जागी त्याचा चुलत भाऊ नवरदेव बनून आला होता. हे पाहताच नवरीच्या घरच्यांनी लग्नाला नकार देत साखरपुड्यासाठी खर्च केलेले 1 लाख रूपये परत मागण्यास सुरुवात केली. लग्नात का चोरतात नवरदेवाचे बूट? रंजक आहे यामागचं कारण बुधवारी हे लग्न होतं. वरात आली होती. लग्नातील एका विधीदरम्यान जेव्हा काही महिला नवरदेवाजवळ गेल्या तेव्हा वराला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. कारण त्यांनी ज्या मुलाशी त्यांच्या मुलीचं लग्न निश्चित केलं होतं, तो तिथे नव्हताच. त्याच्या जागी त्याचा चुलत भाऊ नवरा बनला होता. या प्रकाराने मुलीच्या घरचे संतप्त झाले. त्याचवेळी वधूनेही लग्नास नकार दिला. ही गोष्ट गावात आगीसारखी पसरली. मुलीकडच्या लोकांनी नवरी आणि वराला घेरलं. यादरम्यान काही लोकांची बाचाबाची झाली. गावातील इतर लोकांनी वराला आणि वरातीतील लोकांना मारहाण होण्यापासून वाचवलं आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस पथक गावात आलं. पथकाने सर्वांना पोलीस ठाण्यात आणलं. ज्या तरुणासोबत मुलीचं लग्न ठरलं होतं, तो तरुण लग्नाच्याच दिवशी घरातून पळून गेल्याचं समोर आलं आहे. त्याचं दुसऱ्याच मुलीवर प्रेम होतं. त्या मुलाने त्या मुलीशी लग्न केलं. अशा स्थितीत मुलाच्या घरच्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी घरातील दुसऱ्या मुलाला नवरीशी लग्न करण्यासाठी तयार केलं होतं. पण हे सगळं इतकं महागात पडेल हे त्यांना माहिती नव्हतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या