JOIN US
मराठी बातम्या / Viral / लग्नाआधीच दारूच्या नशेत नवरदेवाचं नको ते कांड, नवरीने नातं तोडत थेट पोलीसच बोलावले

लग्नाआधीच दारूच्या नशेत नवरदेवाचं नको ते कांड, नवरीने नातं तोडत थेट पोलीसच बोलावले

लग्नातील एक अतिशय अजब घटना समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लप्री-वेडिंग समारंभात मद्यधुंद अवस्थेत वराने चांगलाच गोंधळ घातला.

जाहिरात

marriage

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद 11 एप्रिल : लग्नातील एक अतिशय अजब घटना समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लप्री-वेडिंग समारंभात मद्यधुंद अवस्थेत वराने चांगलाच गोंधळ घातला. त्याने नवरी आणि तिच्या कुटुंबियांशी गैरवर्तन केल्याने हैदराबादमधील एका वधूने लग्न रद्द केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना मोईनाबादमधील एका रिसॉर्टमध्ये घडली आणि वधूचे कुटुंब राहत असलेल्या हैदराबादमधील जुबली हिल्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. लग्नाच्या स्टेजवरच नवरीकडून गोळीबार; घाबरलेला नवरदेव शेजारी बसला अन्.., कांड होताच वधू फरार, Shocking Video लग्नाआधीच्या समारंभात वर आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केल्याचा आरोप वधूच्या कुटुंबीयांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. समारंभातील वराच्या असभ्य वर्तनावरही त्यांनी आक्षेप घेतला. जुबली हिल्सचे निरीक्षक एस राजशेखर रेड्डी यांनी सांगितलं की, “या घटनेनंतर वधूच्या कुटुंबाने लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला.” दरम्यान, वधूच्या कुटुंबाने वराच्या कुटुंबाला दिलेला 3 कोटी रुपयांचा हुंडा वसूल करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला आणि घटनेनंतर ते त्यांच्या मूळ गावी चित्तूरला परतले. वृत्तानुसार, वधूच्या कुटुंबाने वराला हिऱ्याची अंगठी आणि 2 लाख रुपये किमतीचे घड्याळही भेट दिले होते. प्री-वेडिंग सेरेमनीसाठी मुलीच्या कुटुंबीयांनी सुमारे 50 लाख रुपये खर्च केले होते.

दरम्यान, पोलिसांनी वर, त्याचे कुटुंब आणि मित्रांविरुद्ध कलम ३५४, ३२४, ४२०, ४०६ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या संपूर्ण घटनेनंतर नवरीने आपल्या कुटुंबासोबत चर्चा करून हे लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या