नवी दिल्ली 10 एप्रिल : लग्नसमारंभातील निरनिराळ्या घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर, काही भावुक करणारे तर काही धक्कादायक असतात. सध्या अशाच एका लग्नातील एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात नवरीने स्टेजवरच हवेत गोळ्या झाडल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्ह़िडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही घटना लग्नाचे विधी सुरू असताना घडली, यावेळी नवरी आपल्या नवरदेवासोबत सोफ्यावर बसली होती. मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने नवरीकडे रिव्हॉल्व्हर दिली आणि त्यानंतर तिने स्टेजवर गोळीबार केला. पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर गोळीबारातील नवरी फरार झाली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये वधू पिस्तूल धरून हवेत अनेक राऊंड फायरिंग करताना दिसत आहे, तर वर तिच्या बाजूला शांतपणे बसलेला आहे.
कोतवाली हाथरस जंक्शनचे एसएचओ गिरीश चंद गौतम म्हणाले, “हाथरस जंक्शन परिसरात राहणाऱ्या वधू रागिणीविरुद्ध आयपीसी कलम २५(९) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या भीतीने ती फरार झाली आहे. आम्ही तिचा शोध घेत आहोत. वधूला पिस्तूल देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचाही आम्ही प्रयत्न करत आहोत.” लग्नाच्या दिवशी गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय वधूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एका लग्नातील एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात नवरीने स्टेजवरच हवेत गोळ्या झाडल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्ह़िडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. pic.twitter.com/VMBLDHzyLw
— News18Lokmat (@News18lokmat) April 10, 2023
वधूच्या नातेवाईकाने शुक्रवारी रात्री हातरस जिल्ह्यातील एका गेस्ट हाऊसमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. व्हिडिओमध्ये एक अज्ञात व्यक्ती वधूकडे पिस्तूल देताना दिसत आहे. वरमाला समारंभानंतर नववधू हवेत गोळीबार करताना दिसते. “या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे,” असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक कुमार यांनी सांगितले. शुक्रवारी लग्नादरम्यान एका नववधूने हवेत चार गोळ्या झाडल्यानंतर कार्यक्रमात गोळीबाराशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वधूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातरस जंक्शन पोलीस स्टेशनचे प्रभारी गिरीश चंद गौतम यांनी सांगितलं की, रविवारी ज्या व्यक्तीच्या नावाने बंदूक परवाना जारी करण्यात आला होता, त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.