मृत्यूच्या दारातून परत आला
नवी दिल्ली 06 मे : जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते ज्यांचा आपल्या मेहनतीवर विश्वास आहे, नशिबावर विश्वास नाही आणि दुसरे ते आहेत जे नशिबावर विश्वास ठेवून त्यानुसार काम करतात. पण काही नशीब आणि मेहनत या दोन्हीवर विश्वास ठेवतात. नशीबासारखं असं काही नसतं हे सत्य ते कधीच पूर्णपणे फेटाळून लावत नाही! जर तुम्हीही असे असाल तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर पाहा, जो पाहिल्यानंतर तुम्हाला खात्री होईल की एखाद्या व्यक्तीचे कर्म किंवा नशीब देखील त्याच्यासोबत असतं, जे त्याचं आयुष्य बदलू शकतं.
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटरवर खूप सक्रिय राहतात आणि अनेकदा आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट करत राहतात. अलीकडेच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये माणसाच्या नशिबाचं अनोखं दृश्य पाहायला मिळत आहे. व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिलं - “जर तुमचा कर्म किंवा नशिबावर विश्वास नसेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा विचार करायला लावू शकतो!”
व्हायरल झालेला व्हिडिओ एक सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्यामध्ये एक मुलगा फूटपाथवर उभा असल्याचं दिसत आहे. तो फूटपाथवर उभा आहे आणि त्याच्या देहबोलीवरून तो कोणाची तरी वाट पाहत आहे किंवा खूप कंटाळला आहे, असं दिसतं. पायातील बुटाने काहीतरी उडवल्यानंतर तो त्याच्या जागेवरून दूर जातो. इतक्यात एक वेगवान कार तिथे येते आणि त्याच्या शेजारील खांबाला धडकते. या अपघातात कारचा चुराडा झाला आणि मुलगा थोडक्यात बचावला. जर तो आधीच्या ठिकाणी आणखी काही क्षण राहिला असता तर तो निश्चितच गंभीर जखमी झाला असता किंवा त्याचा मृत्यू झाला असता. गाडी त्याच्या इतकी जवळ आली होती, जे पाहून तुम्ही म्हणाल की मृत्यू त्याला स्पर्श करून गेला. व्हायरल व्हिडिओला 9 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एक म्हणाला - जाखो राखे साइयां, मार सके ना कोई. तर आणखी एकाने कमेंट केली, की हे पाहिल्यानंतर नक्कीच कर्म आणि नशीबावर विश्वास व्हायला सुरुवात होईल.