जुगाडू बाईक
मुंबई, 30 एप्रिल : तशा बाजारात बऱ्याच कंपनीच्या वेगवेगळ्या फिचर्स बाईक तुम्हाला मिळतील. पण सध्या सोशल मीडियावर अशा बाईकचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. ही बाईक कचऱ्यापासून त.ार करण्यात आली आहे. पण त्याचे फिचर्स मोठमोठ्या बाईकमध्येही तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. एका सामान्य मुलाने जबरदस्त अशी जुगाडू बाईक तयार केली आहे. सामान्यपणे बाईक ही टू सीटर असते. दोनपेक्षा जास्त प्रवाशांना बाईकवर बसण्यास कायद्याने मनाई आहे. शिवाय बाईकला पेट्रोल लागतं किंवा चार्जिंग करून चालणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटीही आता उपलब्ध आहेत. शिवाय बाईक उन्हात चालवायची म्हणजे उन्हाच्या झळा लागताताच. पण सामान्य मुलाने कचऱ्यापासून तयार केलेली ही बाईक ज्यात अशी कोणतीच झंझट नाही.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही बाईक सात सीटर आहे. या बाईकला तुम्हाला पेट्रोलची गरज नाही किंवा चार्जिंगसाठी विजेचीही गरज नाही. ही बाईक सूर्यप्रकाशावर चालते. म्हणजे या बाईकवर सोलर पॅनल लावलं आहे. ज्यामुळे उन्हात ही बाईक चार्ज होते आणि ती चालते. शिवाय बाईकवर लावण्यात आलेल्या सोलर पॅनलमुळे बाईकवर बसलेल्यांना थेट ऊनही लागत नाही. मजेमजेत हलवली आणि क्षणात पेटली बाईक, गाडीसह तरुणही…; भयंकर VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एकाच बाईकवर सात जण बसल्याचे दिसत आहे. खूप ऊन आहे, पण बाईकवरील कुणालाच ऊन लागत नाही आहे ते बाईकला ऊर्जा देणाऱ्या सोलर पॅनलच्या सावलीत आहेत. मुलाने व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार त्याने ही बाईक टाकाऊ वस्तूंपासून बनवली आहे. शिवाय यासाठी फक्त 10-12 हजार रुपये इतकाच खर्च आला आहे. बिजनेसमन हर्ष गोयंका यांनी या जबरदस्त बाईकचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. तेसुद्धा या जुगाडून बाईकचे फॅन झाले आहेत. एकच उत्पादन इतकं टिकाऊ. स्क्रॅपपासून बनवली, सात सीटर गाडी, उन्हापासून ऊर्जा वापके आणि सावलीही देते. अशा तंत्रज्ञानासाठी आम्हाला आमच्या भारताचा खूप अभिमान वाटतो.
ही जबरदस्त जुगाडू बाईक सर्वांनाच आवडली आहे. सर्व जण या अशा आविष्काराचं कौतुक करत आहेत. तुम्हाला ही बाईक कशी वाटली, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.