प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 30 मे : आकाशात उडणारे पक्षी तुम्ही पाहिले असेल. संध्याकाळच्या वेळेला तर पक्षांचा थवा देखील उडताना दिसतो. पण तुम्ही या पक्षांच्या थव्याला नीट पाहिलंय का? ते नेहमी उडताना एका शेपमध्ये उडताना दिसतात. हा ‘V’ आकार असतो. या आकारात ते एकाच्या मागे एक असे फॉलो करत उडतात. पण कधी विचार केलाय का की हे पक्षी अशा आकारात का उडतात? ते आकाशात कसेही का उडत नाहीत? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. पक्षांना अशा ‘V’ आकारात उडताना पाहून फारच भारी आणि मनोरंजक वाटतं. पण तुम्हाला माहीत आहे का पक्षी असे का करतात? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शास्त्रज्ञांनी देखील या विषयावर दीर्घकाळ चर्चा केली आहे. मात्र, त्यानंतर संशोधनातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या, ज्यावरून कळले की कळपातील ‘व्ही’ आकाराचे पक्षी का उडतात? खरंच सफेद कपड्यात फिरतात का भूत? अनेक वेळा भूतांना पाहिलेल्या महिलेचा धक्कादायक दावा ‘V’ आकारात उडणाऱ्या पक्ष्यांची दोन मुख्य कारणे असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. पहिले म्हणजे ‘V’ आकारात उड्डाण केल्यामुळे त्यांना उडणे सोपे जाते. असे केल्याने ते एकमेकांना धडकत नाहीत आणि समोरच्या पक्षाचा पाठलाग कारणं त्यांना सोपं जातं. गाडीमधील एक्ट्रा टायरला स्टेपनी का म्हणतात? दुसरे कारण म्हणजे पक्ष्यांच्या कळपात पक्षी नेता असतो. तो उडताना बाकीच्या पक्ष्यांना मार्गदर्शन करतो. जेव्हा पक्षी कळपात उडतात तेव्हा तो सर्वात पुढे राहतो. बाकी सगळे त्याच्या मागे उडत राहतात. हे आणखी एक कारण समोर आलं आहे. त्याच वेळी, लंडन विद्यापीठाच्या रॉयल व्हेटर्नरी कॉलेजच्या संशोधनात असे आढळून आले की, जेव्हा पक्षी कळप बनवून व्ही आकारात उडतात तेव्हा आकाशात उडताना हवेशी सामना करणं त्यांना सोपं जातं. त्यामुळे बाजूने उडणाऱ्या पक्ष्यांनाही उडणे सोपे जाते. असे केल्याने त्यांच्या उर्जेचीही मोठ्या प्रमाणात बचत होते. पक्ष्यांमध्ये व्ही आकारात उडण्याची कला लहानांपासूनच अवगत असते, असेही संशोधकांनी सांगितले.