JOIN US
मराठी बातम्या / Viral / Oh No! स्टुडिओत Biparjoy Cyclone ची बातमी देता देता उडाली न्यूज अँकर; Live Video Viral

Oh No! स्टुडिओत Biparjoy Cyclone ची बातमी देता देता उडाली न्यूज अँकर; Live Video Viral

बिपरजॉय चक्रीवादळाची बातमी देताना उडणाऱ्या या न्यूज अँकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

स्टुडिओत बिपरजॉयचा परिणाम? (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जून : बिपरजॉय या भीषण चक्रीवादळा ने गुजरातमध्ये विध्वंस सुरू केला आहे. याचे बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशात एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारणही तसंच आहे. कारण गुजरातमध्ये थैमान घालणाऱ्या चक्रीवादळाचा बंदिस्त स्टुडिओत परिणाम दिसून आला. चक्रीवादळाची बातमी देता देता एक अँकर उडाली आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे स्टुडिओत उडालेल्या या अँकरचा व्हिडीओ पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका न्यूज चॅनेलचा हा स्टुडिओ. ज्यात एक अँकर बातमी देताना दिसते आहे. तिच्या हातात छत्री आहे. हवेचा जोर इतका आहे की ती छत्रीसकट उडत आहे. कसाबसा ती आपला तोल सावरताना दिसते आणि तशाच अवस्थेत बातमीही देते.

आता खरंच स्टुडिओत चक्रीवादळ घुसलं की काय, असा प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पडतो. पण तुम्ही नीट पाहाल तर स्टुडिओत अँकरच्या मागील स्क्रिनवर चक्रीवादळाचा व्हिडीओ लावण्यात आला आहे आणि अँकर जणू काही आपण चक्रीवादळातच आहोत असं दाखवत आहे. वादळाचा फिल देण्यासाठी ती अशी अँटक्टिंग करत आहे. Cyclone Biparjoy : NASA ने टिपलं बिपरजॉय चक्रीवादळाचं भयावह रुप, पाहा PHOTO ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. अनेक युझर्सना अँकरचा चक्रीवादळाची बातमी देण्याचा हा हटके अंदाज आवडला आहे. त्यांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

संबंधित बातम्या

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या