अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झालं आणि आता ते गुजरातच्या दिशेनं वेगानं सरकत आहे. आज गुजरातमध्ये चक्रीवादळ धडकणार आहे. त्याआधी या चक्रीवादळाचं भयंकर रुप नासाने आपल्या कॅमेऱ्यात टिपलं आहे.
आज संध्याकाळी 150 किलोमीटर प्रतितास वेगानं हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं पुढे सरकत आहे. नासाने बिपरजॉय चक्रीवादळाचे सॅटलाइटमधून काही फोटो शेअर केले आहेत.
नासाचे फोटो पाहून समजू शकते की, यावेळी हे वादळ किती भयंकर आहे. नासाने समुद्राच्या जागी पांढर्या वादळाचे मोठे वर्तुळ दिसत आहे. वादळाचे प्रमाण किती मोठे आहे हे सांगण्यासाठी हे चित्र पुरेसे आहे.
जेव्हा ते समुद्र किनार्यावर आदळले, तेव्हा ते किती विनाश घडवू शकतो हे यावरुन लक्षात येऊ शकतं. या वादळाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुजरातमधील प्रशासनाने गुरुवारी सकाळपर्यंत सुमारे एक लाख लोकांना किनारी भागातून बाहेर काढले आहे.
समुद्राचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. सध्या अरबी समुद्राच्या या भागात कोणतेही समुद्री जहाज नाही. मच्छिमारांना या परिसरातून आधीच बाहेर काढण्यात आले होते.
10 जूनपासून किनारी भाग रिकामा करण्याचे काम सुरू आहे. भारतीय रेल्वेनेही या भागातून जाणाऱ्या सुमारे 100 गाड्या रद्द केल्या आहेत. NDRF चे मुख्य लक्ष गुजरात व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रातील किनारी भागावर आहे.