JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : पळत्या बाईकवरुन चोरांनी खेचला फोन, पण पुढे महिलेसोबत भयंकर घडलं

Viral Video : पळत्या बाईकवरुन चोरांनी खेचला फोन, पण पुढे महिलेसोबत भयंकर घडलं

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. हा चोरीचा व्हिडीओ आहे.

जाहिरात

चोरीचा थरार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 जुलै : चोर हे चोरी करण्यासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबतात. जेणेकरुन ते पकडले जाणार नाही. यासंबंधीत काही व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर नक्कीच पाहिले असेल. चोरीचे हे व्हिडीओ नेहमीच आपल्याला आश्चर्यचकीत करतात. चोर हे चोरी करण्यासाठी काय करु शकतात आणि कशाप्रकारे चोरी करतात हे खरंच आश्चर्यचकीत करणारं आहे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. हा चोरीचा व्हिडीओ आहे. Video : चोराचा बळजबरी घरात घुसण्याचा प्रयत्न भलताच फसला, घरातील व्यक्तीने चांगलाच धडा शिकवला या व्हिडीओत चालत्या मोटरसायकलवरुन दोन चोरांनी एका तरुणीच्या हातातून मोबाईल खेचला. ज्यामुळे ही तरुणी भयंकरपद्धतीने तोंडावर आपटली. Viral Video : आधी रिक्षावाल्यासोबत वाद मग महिलेला नेलं फरफटत, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद हा व्हिडीओ इंदूरमधील असल्याची माहिती मिळाली आहे. येथे एका हायवेवर तरुणी फोनवर बोलत जात आहे. तेवढ्यात मागून बाईकवरुन दोन चोर येतात. त्यापैकी मागच्या चोराने तरुणीच्या हातातील मोबाईल फार जोरात ओढला, ज्यामुळे तरुण थेट तोंडावर खाली पडली ज्यामुळे तिला दुखापत झाली आहे. त्यानंतर चोरांनी तेथून पळ काढला.

संबंधित बातम्या

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. ज्यानंतर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या