मुंबई, 07 जुलै : सोशल मीडिया हे व्हिडीओचं भंडार आहे इथे असंख्य फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे कधी आपलं मनोरंजन करतात तर कधी उदाहरण म्हणून आपल्या समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये घरात चोरी करण्यासाठी चोर घुसत असताना एक अजब युक्ती वापरली गेली आहे. विचार करा जर चोर किंवा कोणीतरी तुमचा दरवाजा तोडायला लागला तर तुम्ही काय कराल? किंवा कोणी जबरदस्तीने घरात घुसण्याचा प्रयत्न केला तर काय करावे? बरेच लोक म्हणतात की ते बंदूक बाहेर काढतील किंवा काठी घेऊ उभे राहातील. परंतू तरीदेखील ही खात्री नसते की चोराला तुम्ही रोखू शकाल या उलट चोर तुमच्यावरच हल्ला करण्याची जास्त भीती असते. मध खरं की खोटं कसं ओळखायचं? व्यक्तीनं सांगितली ट्रीक, पाहा Video परंतू आता ती देखील काळजी मिटली आहे कारण या व्हिडीओतील व्यक्तीने चोरासोबत असा काही प्रकार केला की चोरानं तेथून धूम ठोकली आहे. Viral Video : आधी रिक्षावाल्यासोबत वाद मग महिलेला नेलं फरफटत, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद हा व्हायरल व्हिडीओ सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून समोर आला आहे. जो पाहून तुम्ही देखील पुढच्यावेळी चोरासोबत असा प्रकार करुन तुमचा जीव वाचवू शकता. क्लिप क्रेझी (@crazyclipsonly) अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक व्यक्ती दरवाजा तोडताना दिसत आहे. तो दरवाजा तोडण्यासाठी खूप प्रयत्न करतो, शिवाय तो पायानेही दरवाजाला मारताना दिसत आहे. पण दरवाजा मजबूत असल्यामुळे तो तुटला नाही. या दरम्यान, एका व्यक्तीने आतून दरवाजा उघडला आणि तो उघडताच त्याने किटलीत ठेवलेले गरम पाणी चोराच्या अंगावर फेकले.
Man trying to break into home gets boiling hot water thrown in his face pic.twitter.com/F0EN2nJzgw
— Crazy Clips (@crazyclipsonly) July 5, 2023
गरम पाणी चेहऱ्यावर आणि अंगावर चोरानं तिथून धूम ठोकली. या व्हिडीओमध्ये चोर ज्या पद्धतीने पळाला ते पाहून खरोखर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ एक दिवस आधी शेअर करण्यात आला होता, ज्याला आतापर्यंत लाखो व्ह्जूय मिळाले आहेत. तर सहा हजाराहून अधीक लोकांना या व्हिडीओला रिट्वीट केलं आहे. शिवाय अनेकांनी या व्हिडीओवर आपली मत देखील नोंदवली आहेत. अनेकांना ही ट्रीक खूपच फायद्याची वाटली आहे.