विक्रम कुमार झा (पूर्णिया) : बिहारच्या रस्त्यांवर अनेक सायकली दिसत असल्या तरी 80 वर्षांहून अधिक जुन्या सायकलची गोष्ट शहरात खूप प्रसिद्ध आहे. 1940 च्या काळात एखाद्या व्यक्तीकडे सायकल असणे ही मोठी गोष्ट होती. हा अनमोल वारसा जपणारे पूर्णियाचे रहिवासी विनय कुमार साहनी एक रंजक कहानी सांगितली आहे. विनय कुमार यांनी एक सायकल इंग्लंडमधून आणली आहे. ती सायकल कशी आली आणि ती आपल्या वडिलांच्या यशाची साक्षीदार कशी ठरली याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.
या सायकलचा एक रंजक किस्सा सांगताना विनय म्हणाले की, माझ्या आजोबांनी ही सायकल त्यांच्या मुलाला म्हणजे माझ्या वडिलांना 1940 मध्ये अटींनुसार भेट दिली होती. जी इंग्लंडहून कोलकाता बंदरात 50 हजार खर्चून आणली होती. तेथून बेगुसरायपर्यंत आलेली ही सायकल चर्चेचा विषय ठरली आहे.
Railway Track : सामान्यत: ट्रेनला दोन ट्रॅक असतात, पण बांगलादेशातील रेल्वेचे ३ ट्र्रॅक का असतात?स्वातंत्र्यापूर्वी देशात इंग्रजांच्या उच्चपदस्थांच्या या सायकली होत्या. सामान्य लोक फक्त बैलगाडी किंवा घोडागाडी वापरत. ते 1936 साल होते, जेव्हा तंबाखू व्यावसायिक रितलाल साहनी आपल्या मुलाला बनारसीला म्हणाले, तू परीक्षेत पहिला आलास तर तुला बक्षीस म्हणून सायकल देऊ.
ही गोष्ट बनारसीच्या मनाला लागली यातून बनारसी हा शाळेत टॉपर आला. 1940 मध्ये रितलाल साहनी यांनी इंग्लंडहून 50 हजार किंमत देऊन सायकल मागवली, ती एका महिन्याच्या अवधीत बोटीच्या सहाय्याने कोलकाता बंदरात पोहोचली.
विनयने सांगितले की, त्याच्या आजोबांनी स्वतः कोलकाता बंदरातून बेगुसरायपर्यंत सायकल चालवली होती. सायकल बेगुसरायला पोहोचली तेव्हा अनेक नामवंत लोकही त्यांच्या जागी आले. विनयने असेही सांगितले की, माझे वडीलही याच सायकलवर मुलाखतीसाठी पाटण्याला गेले होते. त्यांना आयकर विभागात नोकरी मिळाली.
Tree Bike! झाडावर चढता येणारी बाईक, वयाच्या 51व्या वर्षी लावला शोधवडिलांच्या निधनानंतरही तो आणि त्याचा मुलगा सायकलचा वारसा सांभाळत आहेत. ‘आम्ही इतरांनाही सायकल चालवण्याचा सल्ला देतो असेही ते म्हणाले.