JOIN US
मराठी बातम्या / Viral / बागेमध्ये लोक फिरायला गेले अन् नाग आणि नागिणीचा सुरू होता रोमान्स, LIVE VIDEO

बागेमध्ये लोक फिरायला गेले अन् नाग आणि नागिणीचा सुरू होता रोमान्स, LIVE VIDEO

साप हा महादेवांचा सर्वात प्रिय दागिना मानला जातो. अशातच श्रावणात सापांना इतकं आनंदी झालेलं पाहणं हे अत्यंत शुभ आहे, अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

जाहिरात

दोन सापांना वेटोळा घालून वळवळताना पाहून अनेकांनी किळस व्यक्त केली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आशिष कुमार, प्रतिनिधी पश्चिम चम्पारण, 7 जुलै : भारतात श्रावणाला प्रचंड महत्त्व आहे. या महिन्यात सर्वत्र हिरवंगार प्रसन्न वातावरण असतं. आपण श्रावणाचं स्वागत अतिशय उत्साहाने करतो. महादेवाला मनोभावे पुजतो. परंतु तुम्हाला माहितीये का, आपल्याप्रमाणे प्राण्यांसाठीही हा महिना खास असतो. अनेक प्राण्यांना या काळात नव्या जीवाची चाहूल लागते. त्यांच्यात प्रजननाची क्रिया पार पडते. यंदाच्या श्रावणात अधिक मासामुळे आठ सोमवार असणार आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहितीये. त्यामुळे 18 जुलैला सुरू होणारा श्रावण मास 14 सप्टेंबरला संपणार आहे. तर, उत्तर भारतात श्रावण 4 जुलैला सुरू झाला असून 31 ऑगस्टला समाप्त होईल. बिहारमध्ये श्रावणाच्या पहिल्याच दिवशी एक सापांचं जोडपं एकमेकांच्या गळ्यात गळा घालून नाचताना दिसलं. श्रावणात प्राण्यांमध्ये रोमँटिक वातावरण निर्माण होतं, असं हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणत आहेत. तर, दोन सापांना वेटोळा घालून वळवळताना पाहून अनेकांनी किळस व्यक्त केली आहे.

बिहारच्या पश्चिम चम्पारण जिल्ह्यातील रतनमाला गावातल्या बागेत हे जोडपं जणू एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालं होतं. माणूस दिसला की डसणाऱ्या या सापांना त्यावेळी आजूबाजूला कोणी दिसतच नव्हतं. परंतु त्यांना पाहण्यासाठी मात्र मोठी गर्दी जमली होती. लोक कोणतीही भीती मनात न बाळगता कुतूहलाने त्यांचं प्रेम पाहत होते. काहीजणांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं.

दरम्यान, साप हा महादेवांचा सर्वात प्रिय दागिना मानला जातो. त्यामुळे महादेवांना समर्पित असलेल्या श्रावणात सापांना इतकं आनंदी झालेलं पाहणं म्हणजे  अत्यंत शुभ संकेत आहे, अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या