JOIN US
मराठी बातम्या / Viral / Success Story : अशिक्षित समजून दिली नाही गार्डची नोकरी, पठ्ठ्याने नाकावर टिचून उभी केली कंपनी

Success Story : अशिक्षित समजून दिली नाही गार्डची नोकरी, पठ्ठ्याने नाकावर टिचून उभी केली कंपनी

त्याने त्याच्या कंपनीची टॅगलाईनही अतिशय आकर्षक अशी ठेवली आहे. ‘रिवोल्यूशन इस ऑन द वे’ म्हणजेच क्रांतीच्या मार्गावर असं स्लोगन त्याने ठेवलं आहे.

जाहिरात

त्याने प्रवाशांनो, आता काच फेरीचं भाडं द्या, असं आवाहन सर्वांना केलं आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सच्चिदानंद, प्रतिनिधी पाटणा, 21 जुलै : आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गाडीने जायचं असेल, तर आपण इंटरनेटवरून झटपट गाडी बूक करू शकतो. बऱ्याचदा आपल्याला ज्याठिकाणी जायचं असतं तिथून लगेच परत यायचं नसतं. मात्र तरीही आपल्याला जायचं आणि परत यायचं असं दोन्ही भाडं एकाच फेरीसाठी द्यावं लागतं. यावरच बिहारच्या एका तरुणाने एक जबरदस्त उपाय शोधून काढलाय. त्याने चक्क स्वतःची कंपनी सुरू करून आता प्रवाशांनो…एकाच फेरीचं भाडं द्या, असं आवाहन सर्वांना केलं आहे. दिलखूश कुमार असं या तरुणाचं नाव असून तो बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील रहिवासी आहे. या गावाने बिहारला अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी दिले. हे गाव अतिशय पुढारलेलं आहे. याच वातावरणात राहून दिलखूशच्या डोक्यात ही भन्नाट कल्पना आली. त्याने ‘रोडबेज’ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीद्वारे प्रवाशांना चारचाकी गाड्यांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येतं. गेल्या वर्षभरात 2 लाख लोकांनी त्याच्या गाड्यांमधून प्रवास केला आहे.

दिलखूश हा एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झाला. शिक्षणात त्याला फार रस नव्हता, मात्र परिस्थिती बदलण्याची जिद्द होती. त्याच्या आयुष्यात एक क्षण असाही आला की, त्याला रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकावी लागली. शिवाय मुलाखतीत अ‍ॅपल कंपनीचा लोगो न ओळखता आल्याने त्याला सुरक्षारक्षकाची नोकरीही मिळाली नव्हती. मग त्याने ई-रिक्शा चालवण्यास सुरुवात केली. त्याचे वडील बसचालकाची नोकरी करत असत. मात्र अनेक अडचणींवर मात केल्यानंतर आता दिलखूशच्या आयुष्यात सर्वकाही आलबेल सुरू आहे. मुळात गाडीच्या भाड्याबाबत असा निर्णय घेणारा तो बिहारमधील पहिला व्यक्ती ठरलाय. विशेष म्हणजे आता आयआयटी आणि आयआयएम पास लोकही त्याच्या कंपनीत नोकरीला आहेत. येऊ दे आपत्ती, राम मंदिर आहे सज्ज! जर 8.0 तीव्रतेचा भूकंप आला तरी पडणार फरक दिलखूशने त्याच्या कंपनीबाबत दिलेल्या माहितीनुसार, Rodbez ही बिहारमधील सर्वात मोठी आणि पहिली वन-वे चारचाकी सर्व्हिस आहे. यामध्ये विविध प्रकारच्या चारचाकी गाड्या आणि टॅक्सीचा समावेश आहे. आपण या गाड्यांनी एखाद्या ठिकाणी जाऊ शकतो, मात्र जिथपर्यंत जाणार केवळ तेवढंच भाडं द्यावं लागेल. येण्या-जाण्याचं दोन्ही भाडं देण्याची आवश्यकता नाहीये. महत्त्वाचं म्हणजे एखाद्या प्रवाशाने रेल्वे स्थानकावर किंवा विमानतळावर जाण्यासाठी Rodbez गाडीने प्रवास केला आणि या सेवेमुळे त्यांना ठरलेल्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला, तर कंपनीकडून त्यांना रेल्वेचं किंवा विमानाचं नवं तिकीटही खरेदी करून दिलं जाईल. विशेष म्हणजे दिलखूशने त्याच्या कंपनीची टॅगलाईनही अत्यंत आकर्षक अशी ठेवली आहे. ‘रिवोल्यूशन इस ऑन द वे’ म्हणजेच क्रांतीच्या मार्गावर असं स्लोगन त्याने ठेवलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या