JOIN US
मराठी बातम्या / Viral / छेड काढणाऱ्या रोमिओला चपलांनी बदडलं, तरुणीनं केलेल्या धुलाईचा पाहा VIDEO

छेड काढणाऱ्या रोमिओला चपलांनी बदडलं, तरुणीनं केलेल्या धुलाईचा पाहा VIDEO

तरुणीची छेड काढणं तरुणाला चांगलंच भोवलं आहे. या तरुणीनं त्याला चांगलाच धडा शिकवला. नेमकं काय घडलं पाहा VIDEO

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा, 13 जानेवारी : अनेकदा रोड रोमिओंच्या भीतीनं मुली गप्प राहतात पण एका तरुणीनं छेड काढणाऱ्या तरुणाला जबरदस्त शिक्षा दिली आहे. छे़ड काढताना पकडल्या गेलेल्या तरुणाची तर चपलांनी धुलाई केलीच पण या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल करण्यात आला आहे. रोमिओने एका तरुणीची छे़ड काढली आणि त्याच दरम्यान तो पकडला गेला नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या. बिहारच्या कटिहार परिसरात एका रोमिओनं तरुणीची छेड काढली. त्याच वेळी त्यानं तरुणीचा हाथ जबरदस्ती पकडला आणि ती सोडण्याची विनवणी करूनही तो जबरदस्ती करायला लागला. त्यानंतर तरुणीनं हिम्मत करून पायातली चप्पल काढली आणि त्याला बदड बदड बदडलं. हा संपूर्ण गोंधळ पाहण्यासाठी परिसरातील लोक जमा झाले आणि एकाच गोंधळ उडाला.

संबंधित बातम्या

किटहार परिसरात गौशाला चौकात तरुणीची छेड काढणं तरुणाला चांगलंच भोवलं आहे. या तरुणीनं त्याला चांगलाच धडा शिकवला. त्याला चपलेनं बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी नगर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तरुणीनं या रोमिओला जो धडा शिकवला ते पाहून स्थानिकही तिचं कौतुक करत आहेत. स्थानिकांनी देखील या तरुणाला बेदम मारहाण करून पोलिसांच्या हवाली केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या