JOIN US
मराठी बातम्या / Viral / काय सांगता राव! चक्क बिअर पिते ही बाईक; टल्ली होताच असं काही करते की VIDEO पाहून थक्क व्हाल

काय सांगता राव! चक्क बिअर पिते ही बाईक; टल्ली होताच असं काही करते की VIDEO पाहून थक्क व्हाल

बिअर पिणाऱ्या बाईकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 मे : आतापर्यंत तुम्ही बऱ्याच गाड्या पाहिल्या असतील. डिझेल, पेट्रोल आणि आता तर विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्याही आल्या आहेत. हे इंधन म्हणजे गाड्यांचं खाद्य. पण कधी कोणत्या बाईकला बिअर पिताना तुम्ही पाहिलं आहे का? वाचूनच आश्चर्य वाटेल. पण खरंच एक बाईक बिअर पिते. बिअर पिणाऱ्या बाईकचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. बिअर पिणारी बाईक सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. टल्ली झाल्यानंतर ही बाईक असं काही करते की ते पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. अमेरिकेतल्या एका तरुणाने ही अनोखी बाईक तयार केली आहे. के. मिशेलसन असं या तरुणाचं नाव आहे. जो रॉकेटमॅन म्हणूनही ओळखला जातो. त्याने आजवर बरेच आविष्कार केलेत. त्याच्या नव्या आविष्कारात ही बिअर पिणारी बाईक आहे.

फॉक्स 9 शी बोलताना त्याने सांगितलं की, गॅसच्या किमती वाढत आहेत. मी ड्रिंक करत नाही, दारू पित नाही. त्यामुळे बिअरचा वापर इंधनाच्या रूपात करण्याशिवाय मी दुसरा विचारही करू शकत नाही. आता ऑफिसमध्येही बार! कार्यालयातच दारू मिळणार; बिनधास्त प्या, फुल्ल सरकारी परमिशन ही बाईक  गॅस संचालित इंजिनऐवजी हिटिंग कॉईलसह 14 गॅलन केग आहे. कॉईल बिअरला  300 डिग्रीपर्यंत गरम करतं. यानंतर नोझलमध्ये सुपर-हिट स्टीम बनतं, जे बाईकला पुढे ढकलतं. ही मोटारसायकल 150 मिल प्रति तास वेगाने चालते.

आतापर्यंत ही बाईक बाजारात आली नाही पण काही कार शोमध्ये ही बाईक सहभागी झाली आणि प्रथम क्रमांतही पटकावला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या