प्रतिकात्मक फोटो
केरळ : तुम्ही तर हे ऐकलं असेल की आता जर का तुम्ही ट्राफिकचे कोणतेही नियम मोडले तर तुमच्या वाहनाचं ऑनलाई चलान कापलं जाणार. मग तुम्ही हेल्मेट घातलेलं नसाल किंवा मग सिग्नल, ओव्हर स्पिडिंग, तसेच नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केलं असेल तरी तुमच्या गाडीवर चलान येऊ शकतं, जे तुम्हाला आरटीओ ऍपवर दिसतं. जेथे तुम्हाला ऑनलाइनच चलान भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण एका व्यक्तीच्या गाडीचं चलान कापल्यामुळे त्याचा संसार मोडला गेला. आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का? चलान तर गाडीचं कापलं गेलंय, मग त्याच्या संसाराशी संबंध काय? नक्की हा प्रकार काय? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. बायको प्रियकरासोबत बेडवर असताना कॅमेरा घेऊन पोहोचला नवरा आणि… Video कैद झाला संपूर्ण प्रकार कॅमेरा किंवा पोलीस जेव्हा ऑनलाई चलान मारतात तेव्हा, ते पुरावा म्हणून त्या वाहनाचा आणि चालकाचा फोटो काढतात, जो ऍपवर देखील अपलोड करतात. तसंच या व्यक्तीसोबत देखील घडलं. पण जेव्हा ट्राफिक चलान कापलं गेलं, तेव्हा ही व्यक्ती दुसऱ्या एका महिलेसोबत फिरत असल्याचे दिसली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्यक्तीच्या वाहनाचा चलान हा त्याच्या बायकोकडे पोहोचला. जेव्हा तिने तिचा नवरा दुसऱ्या बाईला घेऊन फिरत असल्याचे पाहिले, तेव्हा एकच गोंधळ उडाला. हे प्रकरण केरळ मधील असल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरांची एक चुक आणि वडिलांनी डोळ्यासमोर पाहिला आपल्या नवजात बाळाचा मृत्यू केरळच्या रस्त्यांवर ट्रॅफिक कॅमेरे बसवले आहेत. अशा परिस्थितीत कोणी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचे फोटोसह चालान थेट घरी पोहोचते. या प्रकरणातही तसेच झाले. नवरा एका महिलेसोबत हेल्मेटशिवाय स्कूटी चालवत होता. दरम्यान, त्याचा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला आणि चालान त्याच्या घरी पोहोचल्यावर त्याचे गुपित उघड झाले. इडुक्की येथील रहिवासी असलेला हा माणूस 25 एप्रिल रोजी हेल्मेट न घालता आपल्या गर्लफ्रेंडसोबत शहराच्या रस्त्यावरून स्कूटर चालवत होता. त्यांची स्कूटी त्याच्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत असल्याने चलन पत्नीला पाठवण्यात आले. पत्नीला तिच्या मोबाईलवर उल्लंघनाचा तपशील आणि भरावा लागणारा दंड असा मजकूर संदेश पाठवण्यात आला. मेसेज मिळाल्यावर पत्नीने पतीला विचारले की या फोटोत मागे बसलेली महिला कोण आहे? पतीने दावा केला की त्याचा या महिलेशी काहीही संबंध नाही आणि त्याने तिला फक्त त्याच्या स्कूटरवर लिफ्ट दिली होती, परंतु पत्नीने त्यावर विश्वास ठेवला नाही. यावरून दाम्पत्यामध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नीने 5 मे रोजी करमना पोलिसात तक्रार दाखल केली आणि पतीने तिच्यावर आणि त्यांच्या तीन वर्षांच्या मुलावर अत्याचार केल्याचा आरोप केला. या नवऱ्यावर आता आयपीसीच्या कलम 321, 341 आणि 294 आणि बाल न्याय कायद्याच्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, त्याच्या अटकेनंतर, त्या व्यक्तीला न्यायालयात हजर करण्यात आले, ज्याने नंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले.