गुवाहाटी 25 फेब्रुवारी : आसाममधील काकोईजाना रिजर्व फॉरेस्टमधून विटा घेऊन जाणाऱ्या वाहनाला झालेल्या अपघातात एका मादी माकडाचा मृत्यू झाला. या माकडासोबत तिचं पिल्लूही होतं, जे सुदैवाने या अपघातातून बचावलं. या पिल्लाचा व्हिडिओ समोर आला असून, त्यात त्याच्या चेहऱ्यावरील वेदना स्पष्ट दिसत आहेत. पिल्लू रस्त्यात आईच्या मृतदेहाला चिकटून बसलं आहे. व्हिडिओ पाहिल्यावर असं जाणवतं, की जणू तो तिथे उपस्थित असलेल्या लोकांना प्रश्न विचारत आहे, की त्याच्या आईसोबत असं का झालं? हा व्हिडिओ IFS सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. तलावाच्या काठावर फिरत होती महिला; अचानक मगरीने हल्ला करत जबड्यात पकडलं अन्..थरकाप उडवणारा VIDEO ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करताना IFS सुशांत नंदा यांनी लिहिलं - यामुळे मला खूप दिवस दुःख होईल. आसाममध्ये एका माकडाचा रस्त्यातच मृत्यू झाला. माकडाचं पिल्लू अजूनही त्याच्या कुशीत बसलं आहे, त्याला याची कल्पनाच नाही की आपल्यासोबत काय घडलंय. मला अशी माहिती मिळाली आहे, की पिल्लाला वाचवण्यासाठी सर्व आवश्यक पाऊले उचलली जात आहेत. भरधाव वेगात आलेल्या वाहनाच्या धडकेत या माकडाचा मृत्यू झाला आहे
व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं, की आईच्या मृत्यूमुळे हे पिल्लू अतिशय भावुक झालं आहे. जणू ते तिथे उपस्थित लोकांना विचारत आहे, की असं का झालं आणि आपल्या आईला परत आणण्याची विनंती करत आहे. मात्र आपली आई आता परत कधीच येणार नाही, याची कदाचित त्याला कल्पना नाही. तरीही ते पिल्लू रडत रडत आणि हाताने पकडून आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. श्वानाला वाचवण्यासाठी तरुणाने घेतली रेल्वे ट्रॅकवर उडी; इतक्यात अचानक ट्रेन आली अन्…पाहा VIDEO एका दिवसापूर्वी शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तर २ हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. आपल्या आईला जागं करण्यासाठी पिल्लाची सुरू असलेल्या धडपड पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. त्यामुळे वाहनं चालवताना मुक्या जिवांना विनाकारण त्रास होणार नाही किंवा त्यांना आपला जीव गमवावा लागणार नाही, याची काळजी वाहनचालकांनी घेणं अतिशय गरजेचं आहे.