मुंबई 09 मार्च : तुम्ही लहान मुलांचे एक प्रसिद्ध गाणं ऐकलं असेलच. “छोटा बच्चा जान के ना कोई आँख देखना रे…”. हे अगदी खरं आहे की आपण कोणालाही लहान समजून कमी लेखू नये, कारण तो लहान जीव कधी काहीतरी मोठं करेल हे कोणीही सांगू शकत नाही. ही गोष्ट मानवाच्या बाबतीत लागू आहे, तशीच ती प्राण्यांच्या बाबतही लागू आहे. अनेक वेळा अगदी लहान मुलगी समोर येते किंवा घरात एखादं सापाचं पिल्लू दिसतं, तेव्हा लहान असल्याचं समजून लोक त्याला हलक्यात घेतात. मात्र, ही चूक काहींनी चांगलीच महागातही पडते पाण्यात पक्षासोबत भिडला भलामोठा साप; दोघांच्या खतरनाक लढाईचा चकित करणारा शेवट..VIDEO हीच चूक एका व्यक्तीने केल्याचं सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. ट्विटर अकाऊंट @ViciousVideos वर अनेकदा हैराण करणारे व्हिडिओ शेअर केले जातात. आता याच अकाऊंटवरुन आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात एक व्यक्ती मगरीच्या पिल्लाला पाहून त्याला घाबरण्याची काहीही गरज नसल्याचं समजतो. य़ानंतर तो या पिल्लाला त्रास देण्यास सुरुवात करतो. मात्र मगरीने त्याला अशी अद्दल घडवली, की तो आता आयुष्यभर लक्षात ठेवेल.
व्हिडिओमध्ये एक छोटी मगर खडबडीत रस्त्यावर बसलेली दिसत आहे. ती लहान मगरीसारखी दिसते. एक व्यक्ती तिच्याकडे जातो आणि तिला त्रास देऊ लागतो. हे सर्व तो त्याच्या साथीदाराकडून कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत असतो. त्याच्या हातात चाकूसारखं काहीतरी धारदार आहे, ज्याद्वारे तो मगरीवर वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. यानंतर मगरही रागाच्या भरात त्या व्यक्तीवर वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न करते.
पहिल्यांदा, दुसऱ्यांदा मगर या व्यक्तीला फार काही करत नाही पण तिसऱ्या वेळी ती आपले तीक्ष्ण दात या व्यक्तीच्या हातात गाडून त्याच्यावर हल्ला करते. ती व्यक्ती हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण मगरीची पकड इतकी मजबूत असते की तो हात सोडू शकत नाही. या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं, की मगर जर यापेक्षा थोडी मोठी असती तर ती व्यक्ती मगरीचं अन्न झाली असती. आणखी एकाने म्हटलं की ती व्यक्ती देखील मूर्ख आहे, तो पॉकेट वाल्या चाकूने मगरीला मारण्याचा प्रयत्न करत आहे.