व्हायरल व्हिडीओ
मुंबई, 29 जून : एकादा सण किंवा सिजन आला की त्यासंबंधीत व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागतात. आज आषाढी देवशयनी एकादशी आहे. या दिवसासाठी लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटीला जातात. या वारीचे वारे मागच्या काही दिवसांपासून वाहात होते. यासंबंधीत अनेक व्हिडीओ देखील शेअर, पोस्ट केले जात होते. आज वारीतील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे, ज्याने लोखो लोकांचे मन जिंकले आहे. हा व्हिडीओ वारीतील एका जोडप्याचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या व्हिडीओत नवरा-बायको दोघेही विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. ते गाणी गाताना, नाचताना तसेच पारंपारीक नृत्य करताना दिसत आहेत. एकतर इतक्या जास्त वयात अफाट एनर्जी आणि देवासाठीचे वेड, तसेच तो आनंद यासगळ्यानेच लोकांचं लक्ष या व्हिडीओकडे वेधून घेतलं आहे. या शिवाय दोघांच्या नात्यामधील एक गोड क्षण देखील त्यामध्ये टिपला गेला आहे, जो त्यांची मैत्री, प्रेम आणि माया दाखवून देत आहे आणि याच कारणामुळे हा व्हिडीओ आजच्या दिवसातील सर्वात सुंदर व्हिडीओ मानला जात आहे. विठूरायाचं गाणं, त्यात तल्लीन झालेलं जोडपं जे आपलं वय आणि दु:ख विसरुन पूर्णपणे देवाच्या भक्तित तल्लीन झालेत.
‘रखूमाई’ या गाण्यावर एका वृद्ध महिलेला विठूरायाची बायको म्हणून संबोधलं गोलं आहे. विठ्ठलाच्या आयुष्यात रखुमाईचं महत्व आणि कार्य किती महत्वाचं आहे. हे देखील सांगण्याच जणू काही प्रयत्न केल्याचं जाणवत आहे. हा व्हिडीओ travelstories_by_anand नावाच्या अकाउंटवरुन इंस्टाग्रावर अपलोड करण्यात आला आहे. 28 तारखेला अपलोड केलेल्या या व्हिडीओला फक्त एका दिवसातच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.