JOIN US
मराठी बातम्या / Viral / काय सांगता! प्राण्यांच्या रक्तापासून तयार केलं जात आहे पिण्याचं पाणी

काय सांगता! प्राण्यांच्या रक्तापासून तयार केलं जात आहे पिण्याचं पाणी

सामान्यपणे हवा थंड झाली की तिचं रूपांतर पाण्यात होतं. पण तुम्ही कधी रक्ताचं पाणी ऐकलं आहे का?

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ब्रुसेल्स, 08 जून : पाणी कुठून येतं असं तुम्हाला विचारलं तर ते पावसाच्या रुपात आकाशातून आणि नंतर जमिनीवर तलाव, नदी या रुपात मिळतं. जमिनीखालीसुद्धा पाणी असतं. सामान्यपणे हवा थंड झाली की तिचं रूपांतर पाण्यात होतं. पण तुम्ही कधी रक्ताचं पाणी ऐकलं आहे का? तुम्हाला वाचूनच धक्का बसेल. पण पिण्याचं पाणी रक्ता पासून तयार केलं जात आहे, तेसुद्धा प्राण्यांच्या. विज्ञानामुळे जगात बरंच काही बदललं आहे आणि बरंच काही बदलणार आहे. त्याचे काही तोटेही आहेत आणि काही फायदेही. त्याच वेळी, असं काही तंत्रज्ञानदेखील तयार केलं जात आहे, जे आपल्या विचारांच्या पलीकडे आहे. असंच तंत्र बेल्जियमच्या एका कंपनीने विकसित केलं आहे.

बेल्जियममधील एक कंपनी प्राणी प्रथिन उत्पादनांच्या पुरवठ्यामध्ये अग्रेसर आहे. ते प्राण्यांचं रक्त आणि कोलेजन उच्च दर्जाच्या प्रथिन पावडरमध्ये रूपांतरित करतात, ज्याचा वापर मानव आणि प्राण्यांसाठी अन्नात केला जातो. आतापर्यंत ही कंपनी जमिनीखालून पाणी काढत असे आणि ते आपल्या कामात वापरत असे, मात्र आता या कंपनीने वेगळा पर्याय शोधला आहे. बाबो! सोन्यापेक्षाही महाग पाणी; बाटलीची किंमत इतकी की वाचूनच घसा कोरडा पडेल डुकराचे रक्त साठवण्यासाठी वापरण्यात येणारी टाकी ही कंपनी पाण्याने धुत असे आणि यात बरंच पाणी वाया जात असे. अशा परिस्थितीत 17 कोटी 66 लाखांहून अधिक रक्कम गुंतवून कंपनीने असे जलशुद्धीकरण प्रतिष्ठान उभारले आहे, ज्याद्वारे पिण्याचे पाणी डुकराच्या रक्तापासून बनवता येईल. या तंत्राविषयी माहिती देताना कंपनीचे सीईओ रॉबर्ट स्लाय यांनी सांगितलं की, आधी रक्त उकळलं जाईल आणि वाफेच्या स्वरूपात मिळणारे पाणी घनीभूत करून नंतर पाण्यात रूपांतरित केलं जाईल. या नवीन जलशुद्धीकरण केंद्रातून मिळणारे पाणी उत्पादनात वापरले जाणार आहे. त्यामुळे 40 टक्के पाण्याची बचत होण्यास मदत होणार आहे. यामुळे टाकी स्वच्छ होईल आणि ती पिण्यायोग्यही होईल. त्याची चव अगदी पाण्यासारखी असेल. उन्हाळ्यात माठातील पाणी पिताय सावधान! 2 दिवसांत होते अशी अवस्था; Shocking Video या इन्स्टॉलेशनमधून दररोज दीड लाख लीटर पाणी मिळू शकतं, असं ते म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या