मुंबई, 08 मे : उन्हाळ्यात तहान तर खूप लागते. पण यावेळी थंडगार पाणी प्यावंसं वाटतं. यासाठी सध्या फ्रीज आहे पण तरी काही जणांना माठातील पाणी प्यायला आवडतं. त्यामुळे फ्रीज असला तरी घरात माठ हा असतोच. फ्रीजमधील थंड पाण्यापेक्षा माठातील थंड पाणी चांगलं असं म्हणतात. पण माठातील पाणीही तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जेव्हा फ्रीज नव्हता तेव्हा लोक थंड पाण्यासाठी माठच वापरत. पण मडक्यातील पाणी पिताना काळजी घ्यायला हवी. जर पुरेशी काळजी घेतली नाही. तर हे पाणीही तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. त्यामुळे या व्हिडिओमध्ये लोकांना मडक्याचे पाणी पिण्यापूर्वी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
एकदा का आपण माठात पाणी भरलं की ते संपेपर्यंत पुन्हा त्या माठात डोकावून पाहत नाही, किंवा त्याच माठात असलेल्या पाण्यात दुसरं पाणी ओततो. माठातील पाणी आपण ग्लासाने काढून घेतो. पण तुमची हीच चूक तुम्हाला महागात पडेल. कारण हे पाणी कसं आहे, त्या पाण्यात काय आहे हे आपल्याला दिसत नाही. ग्लासात स्वच्छ पाणी दिसतं आणि आपल्याला ते पाणी स्वच्छ आहे असंच वाटतं. दरवाजावर पाण्याने भरलेली पिशवी नक्की लटकवा, दूर होईल मोठा त्रास; कोणता ते पाहा VIDEO पण या व्हिडीओत तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला धक्काच बसेल. या पाण्यात चक्क कीडे तरंगताना तुम्हाला दिसतील. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार माठातील पाणी दर दोन दिवसांनी बदलावं. माठ आतून धुवून पुन्हा त्यात पाणी भरावं. दोन दिवसांनंतरही पाणी तसंच राहिलं तर त्यात असे कीड होऊ शकतात.
हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. अनेकांनी आपण कित्येक दिवस माठ धूत नसल्याचं म्हणत आता ही चूक करणार नाही, असं म्हटलं. कोणता माठ चांगला? काळा, लाल की पांढरा? कोणत्या माठात पाणी राहतं थंडगार? तुम्हीसुद्धा आतापर्यंत अशीच चूक करत होता का? माठाबाबत तुमच्याकडे आणखी काही सल्ले असतील तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.