नवी दिल्ली 16 मार्च : आजकाल लोक सेल्फीसाठी काय करतील, हे सांगता येत नाही. काही लोक उंच डोंगरावर जातात तर काही डोंगरावरून उडी मारतात. काही स्टंट करतात तर बरेच लोक वन्य प्राण्यांच्या जवळ जातात आणि त्यांचे फोटो काढतात. तुम्ही प्राणीसंग्रहालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल, की प्राण्यांच्या जवळ जाण्यासाठी लोक किती उत्साही असतात. मात्र ही हौस एका मुलाला चांगलीच महागात पडली. तो चिंपांझीसोबत फोटो काढायला गेला तेव्हा चिंपांझी भडकला. मग त्याने जे केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. Viral Video: जंगलाच्या राजासोबत पंगा घेणं भोवलं; हल्ला करत सिंहाने जबड्यात पकडला हात, अन्… हा व्हिडिओ इंडोनेशियातील कासांग कुलीम प्राणीसंग्रहालयाचा आहे. ही घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती, मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाला पिंजऱ्यात असलेल्या चिंपांझीसोबत सेल्फी घ्यायचा होता. त्याने आवारात उडी मारली आणि चिंपांझीला मिठी मारण्याचा प्रयत्न सुरू केला. पण हा व्यक्ती जवळ जाताच प्राण्याला राग आला. चिंपांझीने त्याचा टी-शर्ट पकडला आणि तो या मुलाला ओढू लागला. त्याचा पाय पकडला. त्याला इतक्या जोरात पकडलं की मुलाला स्वतःला सोडवणंही कठीण झालं. इतक्यात आणखी एक व्यक्ती तिथे आला आणि त्याने याला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र याचाही काही उपयोग झाला नाबी. व्यक्तीने चिंपांझीच्या पायाला चावण्याचाही प्रयत्न केला, मात्र काही उपयोग झाला नाही.मात्र , सुदैवाने या घटनेत या व्यक्तीचा जीव वाचला.
प्राणीसंग्रहालय प्रशासनाने सांगितलं की, या तरुणाला चिंपांझीसोबत व्हिडिओ काढायचा होता पण परवानगी न घेता त्याने कुंपणात उडी मारली. त्याने सुरक्षित अंतर राखण्यासाठी बनवलेलं बॅरियरही पार केलं. हे अतिशय वे़डेपणाचं होतं. त्याने स्वतःला आणि इतरांना मोठ्या संकटात टाकलं. कोणत्याही अभ्यागताला पुन्हा असे करण्याची संधी मिळणार नाही. घटना घडली तेव्हा सर्व कर्मचारी लंच ब्रेकवर होते, तेव्हाच तो तरुण आतमध्ये घुसण्यात यशस्वी झाला, अशी माहिती देण्यात आली आहे.
सुमारे 15 सेकंदांचा हा व्हिडिओ @videoshitting नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. शेअर केल्याच्या तासाभरात तो 52 हजार वेळा पाहिला गेला. 1500 हून अधिक लोकांनी लाईक केला आणि अनेकांनी कमेंट केल्या. एका यूजरने लिहिलं की, व्हिडिओमध्ये जेव्हा चिंपांझी व्यक्तीला मिठी मारतो तेव्हा त्याची अवस्था बिकट होते. त्या व्यक्तीसोबत त्याचा मित्रही खूप घाबरतो. प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची छेड काढणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ धडा आहे. दुसर्याने लिहिलं, जंगल असो किंवा प्राणीसंग्रहालय, त्यांच्याशी कधीही वाईट वागू नये. अन्यथा असंच होईल.