आजीबाईंचा हटके नागिन डान्स
नवी दिल्ली, 23 मे : आजकाल प्रत्येक समारंभात चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वच मजा-मस्ती करताना दिसतात. सोशल मीडियावर यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. यामध्ये चिमुकल्यांचा मजेशीर अंदाज तर वृद्धांची हटके स्टाईल पहायला मिळते. नुकताच एका आजीचा डान्स करताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच समोर आलेला व्हिडीओ आजीच्या डान्सचा आहे. या वयात बऱ्याच लोकांना उठायला, फिरायला त्रास होतो मात्र व्हिडीओमधील ही आजी या वयातही भन्नाट डान्स करत आहे. आजीचा हा डान्स पाहून तुमचा दिवस बनेल.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही मुली ढोल ताशाच्या तालावर बेभान होऊन नाचत आहेत. या तरुण मुलींसोबत आजीही ठेका धरते आणि तिच्या हटके अंदाजात नाचते. आजीचा अनोखा आणि एनर्जेटिंक डान्स चांगलाच व्हायरल होतोय. पुढे आजी नागिन डान्स करायला सुरुवात करते. आजीचा हा नागिन डान्स पाहून सर्वच थक्क होतात आणि आजीचा हा अंदाज पाहून ओरडायला लागतात. आजी तिचा अनोख्या स्टाईलचा नागिन डान्स करुन झाल्यावर खुर्चीवर जाऊन बसते.
आजीचा हा जबरदस्त नागिन डान्स truptijadh2109 नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट येत असून आजीच्या नागिन डान्सचं कौतुक केलं जात आहे. दरम्यान, यापूर्वीही अनेक वृद्धांचे डान्स करतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यांनीही आपल्या अनोख्या अंदाजाने नेटकऱ्यांची मने जिंकली. सोशल मीडियावर असे व्हिडीओ कायमच समोर येत असतात.