JOIN US
मराठी बातम्या / Viral / Shocking! मासे खाणाऱ्यांनो जरूर वाचा ही बातमी; नाहीतर तुमच्याही जीवावर बेतेल

Shocking! मासे खाणाऱ्यांनो जरूर वाचा ही बातमी; नाहीतर तुमच्याही जीवावर बेतेल

मासे खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात

मासे खाताना सावधान

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 नवी दिल्ली, 05 एप्रिल :  मासे म्हटल्यावरच कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. तुम्हीही फिश लव्हर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. कारण मासे खाणे जीवावरही बेतू शकतं. नुकतंच असं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मासे खाणं एका दाम्पत्याला चांगलंच महागात पडलं आहे. महिलेचा मृत्यू झाल आहे, तर तिचा नवरा कोमात गेला आहे. मलेशियातील ही धक्कादायक घटना आहे. 83 वर्षांची ही महिला आणि तिचा नवरा, मासे खाल्ल्यानंतर आजारी पडले.  या दाम्पत्याच्या मुलीने सांगितलं की 25 मार्च रोजी तिच्या पालकांनी जवळच्या दुकानातून पफर फिश विकत घेतलं होतं. दोघांनीही तो मासा खाल्ला. यानंतर काही वेळातच आईला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तिचं शरीर थरथरू लागलं. आईनंतर वडिलांमध्येही अशीच लक्षणं दिसू लागले. ते अद्यापही कोमात आहेत.

न्यूयॉर्क पोस्टने स्थानिक मीडियाचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, या माशात विषारी पदार्थ आहेत.  महिलेच्या मृत्यूचं कारण फूड पॉइझनिंग सांगण्यात आलं आहे, असं जोहोरच्या आरोग्य आणि एकीकरण समितीचे अध्यक्ष लिंग तियान सून यांनी सांगितलं. या माशात घातक विष आढळत असल्याचं ते म्हणाले. काय सांगता? मासा खाणं महागात, तब्बल 15 लाखांचा दंड; पण का पाहा VIDEO डॉक्टरांनी सांगितलं की पफर फिशमध्ये टेट्रोडोटॉक्सिन आणि सॅक्सिटॉक्सिन आढळतात. जे थंड करून किंवा गरम करूनही नष्ट होऊ शकत नाही. हे मासे केवळ कुशल शेफद्वारे तयार केले जाते. असे सेफच आपल्या कौशल्याने त्यातील घातक विष काढून टाकू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या