JOIN US
मराठी बातम्या / Viral / Weird news : सासऱ्याच्या प्रेमात पडली सून, आता जुळ्या मुलांना देणार जन्म

Weird news : सासऱ्याच्या प्रेमात पडली सून, आता जुळ्या मुलांना देणार जन्म

प्रेम कधी कोणावर होईल याचा काही नेम नसतो. त्यामुळे म्हणतात की प्रेम काळ वेळ पाहून केलं जात नाही. प्रेमात वय, धर्म, जात पाहिलं जात नाही.

जाहिरात

सासऱ्याच्या प्रेमात पडली महिला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 जून : प्रेम कधी कोणावर होईल याचा काही नेम नसतो. त्यामुळे म्हणतात की प्रेम काळ वेळ पाहून केलं जात नाही. प्रेमात वय, धर्म, जात पाहिलं जात नाही. अनेकदा प्रेमात धोकाही मिळतो. जवळचेच लोकच फसवणूक करतात आणि त्याचा सुगावाही लागत नाही. असा प्रेमात धोका मिळालेल्या, नात्याला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये पतीचा विश्वासघात करून सासऱ्यावर प्रेम करुन बसली महिला. नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी जाणून घेऊया. यूकेमध्ये राहणारी डेक्लनची 22 वर्षीय पत्नी स्टेफनी तिच्या स्वतःच्या सासरच्या प्रेमात पडली. मिररने याविषयी वृत्त दिलं आहे. जेव्हा डेक्लानला समजले की त्याची पत्नी त्याच्या वडिलांशी रोमान्स करत आहे, तेव्हा त्याला धक्काच बसला. डेक्लनला एक मुलगीही आहे. अशा स्थितीत तो आपल्या मुलीला वडील आणि पत्नीबद्दल कसे सांगणार याची चिंता त्याला सतावत आहे.

मुलीची काळजी घेण्यासाठी डेक्लानने घरात कॅमेरा बसवला होता. ज्यावरून त्याला समजले की त्याची पत्नी आणि वडील बराच वेळ एका खोलीत बंद असतात. तेव्हा त्याचा संशय बळावला. त्याची पत्नी रात्री सासरच्या खोलीत जाते आणि सकाळी बाहेर येते, असे त्याने कॅमेऱ्यात पाहिले. याबाबत डेक्लनने पत्नीला विचारले असता त्याला सत्य समजले. डेक्लनला सर्वात जास्त धक्का बसला जेव्हा त्याला सांगण्यात आले की त्याची पत्नी त्याच्या वडिलांच्या जुळ्या मुलांची आई होणार आहे. हेही वाचा -  Viral Photo : गुगलवर अंडरवेअर शोधत होता, ऑफिसच्या मिटिंगमध्ये अचानक शेअर झाला टॅब आणि…. याविषयी डेक्लन म्हणाला की, त्याला काहीही समजत नाही. आता तो त्याच्या दोन वर्षाच्या मुलीला कसा समजावणार की घरात येणारे पाहुणे तिच्या आजोबांचे आहेत. त्याचबरोबर डेक्लानची पत्नी स्टेफनी हिनेही या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे. स्टेफनी म्हणाली की तिने कोणत्याही प्रकारे आपल्या पतीची फसवणूक केलेली नाही. तिचा नवरा तिला सोडून गेला, त्याच वेळी ती सासऱ्याच्या जवळ आली. त्यानंतर ती सासऱ्याच्या प्रेमात पडली. दरम्यान, यापूर्वीही अशा अनेक विचित्र घटना समोर आल्या आहेत. प्रेमात धोका मिळणं, नवरा किंवा बायकोला इतर कोणावर प्रेम होणं. अशा घटना वारंवार समोर येत असून आता सोशल मीडियावरही याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या