नवी दिल्ली, 02 जून : कोरोना महामारीचं सावट संपूर्ण जगावर भारी पडलं होतं. त्यामुळे कोरोनादरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासून ऑनलाईन काम करण्याची पद्धत सुरु झाली. अजूनही अनेक लोक घरुन ऑफिसची काम करत आहेत. घरुन काम करत असल्यामुळे अनेकदा मिटिंग ऑनलाईन घ्याव्या लागतात. मात्र ऑनलाईन मिटिंगदरम्यान अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक घटना घडतात. सोशल मीडियावरही या घटना व्हायरल होतात. अशातच आणखी एक मजेशीर घटना समोर आली आहे. जी वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
समोर आलेल्या घटनेत अमन नावाच्या व्यक्तीने गुगल मीटमध्ये चुकून चुकीचा टॅब ओपन केला. ज्याचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याने स्वतः ट्विटर अकाऊंटवर याचा फोटो शेअर केला आहे. Google मीटिंग करत असताना, तो त्याच्या लॅपटॉपवर उघडलेल्या एका टॅबवर गेला, ज्याचा स्क्रीनशॉट आता व्हायरल होत आहे. अमन लॅपटॉपवर स्वत:साठी काही अंतर्वस्त्रे शोधत होता, पण तेवढ्यात मीटिंग सुरू झाली. त्याने चुकून तोच टॅब उघडला ज्यामध्ये तो अंडरवेअर शोधत होता. त्या अमनसाठी ते लाजिरवाणे झाले. हा स्क्रीनशॉट इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.
guys pls pray for me 😭 pic.twitter.com/da5md2O4FC
— Aman (@AmanHasNoName_2) June 1, 2023
अमनने पोस्ट केलेल्या फोटोवर सध्या खूप कमेंट आणि लाईक्स येताना दिसत आहे. मिटिंगवेळी अशा मजेशीर घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही अशा घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अशा पोस्ट काही वेळातच व्हायरल होतात. लोकही अशा पोस्टची चांगलीच मजा घेतात.