वाढदिवस
विजय देसाई, मुंबई, 7 मार्च : हौसेला मोल नसते असे म्हणतात ते काही खोट नाही. याची प्रचिती वसईतल्या एका वाढदिवसानिमित्त आली आहे. मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी तब्बल 221 किलोचा केक तयार करुन घेतला. एवढंच नाही तर वडिलांनी मुलाच्या आवडत्या गाडीचा आकाराचा हा केक बनवून घेतला. सध्या या केकची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वसईत पूर्वे कडील कामण गावातील नवीत भोईर हे जिल्हापरिषद शाळेत शिक्षक असून त्यांना लग्नाच्या 6 वर्षा नंतर रेयांश याचा जन्म झाला. त्या नंतर तो एक महिना आयसीयुत उपचार घेत होता. आपल्या मुलाच बारस थाटामाटात करायचं होत मात्र आजारपणामुळे तो करता आला नाही. त्यामुळे रेयांश आजारातून बरा झाल्यानंतर नवीत यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करायचं ठरवलं. विशेष म्हणजे मागीलवर्षी रेयांशच्या पाहिल्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी रेयांशला मुंबईहून हेलिकॉप्टमधून आणण्यात आले होते. रेयांशच्या दुसऱ्या वाढदिवसाला नवीच यांनी तब्बल 21 किलोचा केक कापला. रेयांश याचा शनिवारी दुसरा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त वेरना कारची प्रतिकृती असलेला चक्क 221 किलोचा केक आणला होता. हा केक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. एखाद्या शाही लग्न सोहळ्या प्रमाणे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
वाढदिवसा निमित्त चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, शरीरश्रोष्ठ स्पर्धा जादुगार, तसेच लहान मुलांच्या खेळांचे आयोजन केले होते. गेल्या 15 वर्षापासून ते सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांना प्रसिद्धीच्या झोतात यायचं नव्हत मात्र या केकचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांना माहिती झालं. कोरोना काळात या शिक्षकाने 200 लोकांना धान्यवाटप केल, दरवर्षी दहावी मध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना 7 हजार 14 ट्रॉफी देतात, शाळांच्या क्रीडा स्पर्धा 50 ट्रॉफी देतात, या वेळी दिव्यांगाना व्हीलचिअरचे वाटप करणार आहेत. दिव्यांगाना गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून तो कार्यक्रम स्पेशल करणार असल्याचे भोईर यांनी सांगितले. या वाढदिवसाला राजकीय, सामाजिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.