JOIN US
मराठी बातम्या / Viral / Oh So Sweet! 94 वर्षांची आजी बनली सर्वात Cutest Barbie; VIDEO पाहून सांगा तुम्हाला कशी वाटली?

Oh So Sweet! 94 वर्षांची आजी बनली सर्वात Cutest Barbie; VIDEO पाहून सांगा तुम्हाला कशी वाटली?

94 वर्षांच्या बार्बी आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

बार्बी आजी (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 जुलै : बार्बीची जादू चिमुकलींवर कायमच राहिली आहे. बार्बी डॉल, बार्बी डॉल हाऊस, बार्बीसारखे कपडे, बार्बी शूझ…अगदी लहान मुलीच नव्हे तर अगदी तरुणींनाही बार्बीने भुरळ घातलेली आहे. अशी काही प्रकरणं तुम्ही पाहिली असतील ज्यात बार्बीसारखं दिसण्यासाठी काहींनी चक्क महागड्या सर्जरीही करवून घेतल्या आहेत.  बार्बीला सहा दशकांहून अधिक काळ लोटला तरी बार्बीची क्रेझ काही कमी झालेली नाही. आता तर बार्बी फिल्म रिलीज झाल्यावर ही क्रेझ अधिकच वाढली आहे. सोशल मीडियावरही बार्बी फिव्हर पाहायला मिळतो आहे. सोशल मीडियावर बार्बीशी संबंधित ट्रेंड व्हायरल होत आहेत. बार्बीची ही क्रेझ फक्त लहान मुलं आणि तरुणाईपुरती मर्यादित राहिली नाही. तर अगदी म्हाताऱ्यांवरही बार्बीची जादू झाली आहे. हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एक नव्वदीपार आजी चक्क बार्बी बनली आहे. 94 वर्षांच्या बार्बी आजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हिच्या सौंदर्याला भुलू नका; सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या तरुणीचं शॉकिंग सत्य या आजीचं नाव आहे जिया. तिची नात नात जिनीने तिचा हा बार्बी लूक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत आजी हाय बार्बी असं म्हणताना दिसते आहे. तसंच ती वेगवेगळ्या पिंक ड्रेसमध्ये दिसते. जिनीने हा व्हिडीओ पोस्ट करताना ही आपली 94 वर्षांची आजी जिया असल्याचं सांगितलं आहे. तसंच तिच्या वेगवेगळ्या लूकपैकी तुम्हाला कोणता लूक तुम्हाला आवडला , असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तसंच तुम्ही या बार्बीला भेटला नाहीतर तर तुम्ही बार्बी ट्रेंडमध्ये काहीच पाहिलं नाही, असंही ती म्हणाली आहे. बाबा लगीन! असं लग्न तुम्ही आयुष्यात पाहिलं नसेल; VIRAL VIDEO पाहून सर्वांना भरली धडकी ही 94 वर्षांची बार्बी पाहिल्यानंतर या व्हिडीओवर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडतो आहे. ही बार्बी सर्वांना आवडली आहे. आतापर्यंत पाहिलेली ही सर्वात क्युटेस्ट बार्बी असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.  एका युझरने तर सर्वात आधी बार्बी 1959 साली तयार झाली. त्यामुळे खरतंर बार्बी आता 64 वर्षांची आहे, या दोघी बेस्टी असू शकतात. असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

तुम्हाला ही बार्बी कशी वाटली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या