कुणी कितीही सुंदर असलं तरी काही ना काही उणीव असतेच. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही तरुणी, जी नॅच्युरल ब्युटी असल्याचं म्हटलं जातं आहे.
तिचा चेहऱ्याचा आकार, डोळे, हास्य. केसांच रंग, शरीररना सर्वकाही इतकं परफेक्ट आहे की पाहताच कित्येक लोक तिच्या प्रेमात पडले आहेत. सोशल मीडियावर तिच्याशी फ्लर्ट करण्याचाही काहींनी प्रयत्न केला.
19 वर्षांची ही तरुणी जी फिनलँडमध्ये राहते. तिचं नाव मिला सोफिया असं आहे. ट्विटवर आणि इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. पण तिचं सत्य मात्र वेगळंच आहे.
प्रत्यक्षात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोतील ही तरुणी प्रत्यक्षात नाहीच. म्हणजे तिचा मृत्यू झाला असंही नाही तर ती अस्तित्वातच नाही.
ती एक माणूस नव्हे तर एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेलं एक चित्र आहे. ही तरुणी इतकी सुंदर आणि खरी वाटते की ती कॉम्पुटर जनरेटेड आहे, यावर कुणाचा विश्वासच बसत नाही आहे.
जेव्हा तुम्ही मिलाच्या सोशल मीडिया प्रोफाइल वाचाल तेव्हा त्यात ती एक AI क्रिएशन आणि एक आभासी मुलगी आहे, असं स्पष्टपणे लिहिलेले आहे. (फोटो - इन्स्टाग्राम/मिला सोफियाफिन)