मुंबई, 28 जानेवारी : चोरीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामुळे चोरट्यांची चोरी करण्याची स्टाईल तुम्ही पाहिली असेल. पण आता चोरीचा एका असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. तीन-तीन चोर मिळून साधा एक टीव्हीही चोरू शकले नाही आहेत (Three Thieves Viral Video). त्यांची चांगलीच फजिती झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तीन चोर एकत्र चोरी करायला गेले. कुठे, कधी, कशी चोरी करायचं याचं त्यांनी प्लॅनिंगच केलं होतं, असं एकंदर व्हिडीओ पाहताना दिसतं. पण त्यांचा हा प्लॅन फसतो. एक टीव्ही चोरण्यासाठी तीन जण येतात. पण त्यांना टीव्ही पळवून नेता येत नाही. व्हिडीओत पाहू शकता मध्यरात्री हे तीन चोर कार घेऊन चोरी करायला येतात. एका ठिकाणी एलईडी टीव्ही लावलेला आहे. त्यावर त्यांची नजर पडते. सुरुवातीला एक चोर जातो आणि भिंतीवरील टीव्ही काढण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या एकट्याने काही टीव्ही भिंतीवरून निघत नाही. मग त्याच्या मदतीला दुसरा चोर येतो. हे वाचा - दरूदरून घाम फुटला, किंचाळत पळाला; कित्येक वर्षे बंद घरात जाताच तरुणाची हवा टाईट अखेर दोघं मिळून भिंतीवरील टीव्ही काढण्यात यशस्वी होतात. तिसरा चोर गाडी तयार ठेवतो. टीव्ही नेणाऱ्या दोघांपैकी एक चोर तिथून पुढे जातो आणि शेवटी एकटा राहिलेल्या चोराचा तोल ढासळून तो पडतो. सोबत टीव्हीही जमिनीवर पडतो आणि शेवटी तो फुटतो.
इतकी मेहनत करूनही त्यांच्या हाती काहीच लागत नाही. उलट चोरीची ही ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि ते चांगलेच फसले. हे वाचा - पाण्यात कोसळलेल्या साथीदाराला वाचवण्यासाठी श्वानाची धडपड; शेवटी काय घडलं? Video MEMES.BKS नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.