JOIN US
मराठी बातम्या / Viral / जगातल्या अशा 3 व्यक्ती ज्यांना पासपोर्टशिवाय कोणत्याही देशात जाता येतं

जगातल्या अशा 3 व्यक्ती ज्यांना पासपोर्टशिवाय कोणत्याही देशात जाता येतं

अशा खास व्यक्ती ज्यांना कोणीही पासपोर्ट विचारत नाही. उलट त्यांचा विशेष आदरसत्कार केला जातो आणि प्रोटोकॉलनुसार त्यांची योग्य ती व्यवस्थाही केली जाते.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 जुलै : जगात पासपोर्ट यंत्रणा सुरू होऊन 102 वर्षं होत आहेत. राष्ट्रपती किंवा पंतप्रधान दुसऱ्या देशात जातात, तेव्हा त्यांनाही पासपोर्ट दाखवावा लागतो. तो डिप्लोमॅटिक पासपोर्ट असतो; मात्र जगभरातल्या 200हून अधिक देशांमधल्या तीन व्यक्ती अशा आहेत, की ज्या कोणत्याही देशात पासपोर्टशिवाय जाऊ शकतात. त्यांना कोणीही पासपोर्ट विचारत नाही. एवढंच नाही, तर त्यांचा विशेष आदरसत्कार केला जातो आणि प्रोटोकॉलनुसार त्यांची योग्य ती व्यवस्थाही केली जाते. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याआधी पासपोर्ट यंत्रणेबद्दल थोडं जाणून घेऊ या. विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच असं लक्षात येऊ लागलं, की एका देशातून दुसऱ्या देशात लपूनछपून येणाऱ्यांवर नियंत्रण मिळवलं नाही, तर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतील. किंबहुना तशा समस्या तयार व्हायलाच लागल्या होत्या. तेव्हा पासपोर्टमध्ये आजच्याप्रमाणे सिक्युरिटी फीचर्सही नव्हती, जेणेकरून खोटा पासपोर्ट असलेली व्यक्ती ओळखता येईल.

एका देशाचा नागरिक दुसऱ्या देशात गेला, तर त्याच्याकडे ठोस डॉक्युमेंट असायला हवं, असा काही करारही कोणत्याही देशांमध्ये नव्हता. त्याचदरम्यान पहिलं जागतिक महायुद्ध सुरू होतं. त्यामुळे पासपोर्टसारखी यंत्रणा तयार करणं खूप आवश्यक आहे, अशी निकड सर्वच देशांना भासू लागली होती. VIRAL NEWS : गाढवासह असे 8 प्राणी जे उभ्या उभ्याच झोपतात; पण आपल्यासारखा त्यांचा तोल का जात नाही? 1920मध्ये अचानक सारं काही बदललं. लीग ऑफ नेशन्समध्ये यावर गांभीर्याने विचार करण्यात आला, की पासपोर्टसारखी यंत्रणा साऱ्या जगभरात बनवावी यासाठी अमेरिका पुढाकार घेत होती, जेणेकरून त्यांच्या देशात लपूनछपून येणाऱ्यांवर निर्बंध आणता येतील. 1924मध्ये अमेरिकेने आपली नवी पासपोर्ट प्रणाली सुरू केली. आताच्या जगात पासपोर्ट हे परदेशात जाणाऱ्या व्यक्तीसाठी अधिकृत ओळखपत्र बनलं आहे. त्यात त्या व्यक्तीचं नाव, पत्ता, वय, फोटो, नागरिकत्व आणि स्वाक्षरी ही सगळी माहिती असते. संबंधित व्यक्ती ज्या देशात जाते, त्या देशासाठीही पासपोर्ट असणं सोयीचं ठरतं. आता तर सारे देश ई-पासपोर्टही देऊ लागले आहेत. त्या तीन खास व्यक्ती कोण? संपूर्ण जगात कुठेही पासपोर्टशिवाय जाता येऊ शकतं, अशा तीन व्यक्ती कोण हे आता आपण जाणून घेऊ या. त्या तीन व्यक्ती म्हणजे ब्रिटनचे राजे आणि जपानचे राजा-राणी. चार्ल्स हे ब्रिटनचे राजे बनण्याच्या आधी हा विशेषाधिकार क्वीन एलिझाबेथ यांच्याकडे होता. चार्ल्स जेव्हा ब्रिटनचे राजे झाले, तेव्हा त्यांच्या सेक्रेटरीने त्यांच्या देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून सगळ्या देशांकडे असा संदेश पाठवला, की आता चार्ल्स हे ब्रिटनचे राजे बनले आहेत. त्यामुळे त्यांना कुठेही पूर्ण सन्मानाने जाण्या-येण्याची परवानगी दिली जावी. कुठेही अडवणूक न होवो. तसंच, त्यांचा खास प्रोटोकॉलही लक्षात घेतला जायला हवा. त्यांच्या पत्नीलाही आहे का हा अधिकार? ब्रिटनच्या राजाला हा विशेषाधिकार असला, तरी त्यांच्या पत्नीला मात्र हा विशेषाधिकार नाही. दुसऱ्या देशात जाताना त्यांना आपल्यासोबत डिप्लोमॅटिक पासपोर्ट ठेवावा लागतो. अशा तऱ्हेना राजघराण्यातल्या मुख्य व्यक्तींना डिप्लोमॅटिक पासपोर्ट सोबत बाळगण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारचा पासपोर्ट असलेल्या व्यक्तीला खास सन्मान दिला जातो. कोणत्याही देशातल्या एअरपोर्टवर अशा व्यक्तींचा येण्या-जाण्याचा पॅसेजही वेगळा असतो. महाराणी एलिझाबेथ यांच्या काळात… जेव्हा एलिझाबेथ या ब्रिटनच्या महाराणी होत्या, तेव्हा त्यांना पासपोर्टची आवश्यकता नव्हती; मात्र त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट बाळगावा लागत होता. ‘राणीचा पती तो राजा’ हे समीकरण ब्रिटनमध्ये लागू होत नाही. सत्तारूढ व्यक्ती पुरुष असली, तरच त्या व्यक्तीला किंग असं म्हटलं जातं; मात्र राजसिंहासनावर राणी असेल, तर तिच्या पतीला आयुष्यभर प्रिन्स अर्थात युवराज असंच म्हटलं जातं. जपानचे सम्राट आणि सम्राज्ञी यांनाही विशेषाधिकार ब्रिटनच्या राजाप्रमाणेच जपानचे सम्राट आणि सम्राज्ञी यांनाही पासपोर्टशिवाय कुठेही जाण्याचा विशेषाधिकार आहे. सध्या नारुहितो हे जपानचे सम्राट असून, त्यांची पत्नी मसाको ओवादा या जपानच्या सम्राज्ञी आहेत. नारुहितो यांचे वडील अकिहितो 88 वर्षांचे असून, ते 2019पर्यंत जपानचे सम्राट होते. त्यानंतर त्यांनी रिटायर होण्याचा निर्णय घेतल्यावर नारुहितो सम्राट झाले. सम्राट असेपर्यंत अकिहितो आणि त्यांच्या पत्नी यांना कुठेही जाण्यासाठी पासपोर्ट लागत नव्हता. आता मात्र त्यांना परदेशात जायचं झाल्यास डिप्लोमॅटिक पासपोर्ट बाळगावा लागेल. कोणत्या फळात किडे होत नाही? कोणत्या प्राण्याला सर्वाधिक राग येतो? काय आहे उत्तरं जपानच्या डिप्लोमॅटिक रेकॉर्डनुसार, 1971 साली जपानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने विचार करून या विशेषाधिकाराची व्यवस्था लागू केली. त्यानुसार, जपानमधून तसं एक अधिकृत पत्र जगभरातल्या देशांना पाठवलं जातं. सम्राट किंवा सम्राज्ञी कोणत्याही देशात गेल्यास हे पत्र हाच त्यांचा पासपोर्ट गृहीत धरावा, असं त्या पत्रात लिहिलेलं असतं. जेव्हा ब्रिटनचे राजे किंवा जपानचे सम्राट-सम्राज्ञी यांचा कोणत्याही देशात दौरा असेल, तेव्हा साहजिकच संबंधित देशाला त्याची पूर्वकल्पनाा दिली जाते. पंतप्रधान आणि राष्ट्रपती जगातल्या कोणत्याही देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती/अध्यक्ष जेव्हा दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावर जातात, तेव्हा त्यांना पासपोर्ट सोबत ठेवावा लागतो. फक्त तो पासपोर्ट डिप्लोमॅटिक प्रकारचा असतो. यजमान देशाकडून त्यांना सुविधा दिल्या जातात. त्यांना इमिग्रेशन विभागातल्या अधिकाऱ्यांसमोर स्वतःला जावं लागत नाही. तसंच, त्यांची सुरक्षाविषयक आणि अन्य तपासणीही केली जात नाही. भारतात हा दर्जा पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना आहे. भारतात तीन रंगांचे पासपोर्ट दिले जातात. सर्वसामान्य नागरिकांना निळ्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो. सरकारी अधिकारी, मंत्री यांना वेगळा पासपोर्ट दिला जातो. तसंच, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना डिप्लोमॅटिक म्हणजेच मरून रंगाचा पासपोर्ट दिला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या