नवी दिल्ली, 9 जुलै: जनरल नॉलेज म्हणजेच सामान्यज्ञान हे स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचं आहे. स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी करंट अफेअर्स माहीत असावे लागतात. खरं तर केवळ परीक्षाच नाही तर सामान्य जीवनातही काही बेसिक प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत असावीत. प्रत्येक व्यक्तीचं सामान्यज्ञान चांगलं असायला हवं. विविध विषयांचे अधिकाधिक ज्ञान असणं नेहमीच फायदेशीर ठरतं. म्हणूनच तुम्हीही तुमचं जनरल नॉलेज वाढवायला हवं. जनरल नॉलेज संदर्भात ‘झी न्यूज हिंदी’ने माहिती दिली आहे. अनेक परीक्षांमध्ये सामान्यज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. बऱ्याच जणांना अगदी साध्या प्रश्नांची उत्तरंही माहीत नसतात. त्यामुळे आपल्याला साधे वाटणारे प्रश्नही परीक्षेत विचारले जाऊ शकतात, त्यासाठी अभ्यास करताना असे प्रश्न व त्यांची उत्तरं नजरेखालून घालणं गरजेचं असतं. आज तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी अशाच काही महत्त्वाच्या आणि मनोरंजक प्रश्नांची उत्तरं आम्ही देणार आहोत.
आम्ही इथे काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरं दिली आहेत. तुम्हीही हे प्रश्न वाचा, त्यांची उत्तरं तुम्हाला आधीच माहीत असतील तर उत्तम, पण माहीत नसतील तर ती लिहून काढा, जेणेकरून तुमच्याकडे त्याच्या नोट्स राहतील. प्रश्न 1 - भारतात पहिला साखर कारखाना कुठे सुरू करण्यात आला होता? उत्तर 1 - भारतातील पहिल्या साखर कारखान्याची स्थापना बिहार राज्यात झाली होती. प्रश्न 2 - कोणत्या प्राण्याला सर्वात जास्त राग येतो हे तुम्हाला माहीत आहे का? उत्तर 2 - जंगली लांडग्याला सर्वांत जास्त राग येतो. प्रश्न 3 - भारतात सर्वांत जास्त खाल्लं जाणारं धान्य कोणतं आहे? उत्तर 3 - तांदूळ हे भारतात सर्वांत जास्त खाल्लं जाणारं धान्य आहे. प्रश्न 4 - भारतातील कोणत्या शहरात सर्वांत जास्त सुती कापडाचा उद्योग आहे? उत्तर 4 - अहमदाबादमध्ये भारतातील सर्वांत मोठा सुती कापडाचा उद्योग आहे? प्रश्न 5 - जगातील सर्वांत वेगाने वाढणारी वनस्पती कोणती आहे? उत्तर 5 - जगातील सर्वांत वेगाने वाढणारी वनस्पती बांबू आहे. प्रश्न 6 - असं कोणतं फळ आहे ज्यामध्ये कधीही किडे पडत नाहीत? उत्तर 6 - याचं उत्तर आहे केळी. केळी हे एकमेव फळ आहे ज्यामध्ये किडे पडत नाहीत.