खूप थकलेलं असताना बस किंवा ट्रेनमध्ये एखाद डुलकी तुम्ही काढलीच असेल. पण असं बराच वेळ झोपणं शक्यच नाही. उभ्या उभ्या झोपल्याने तोल जातोच आणि शांत, नीट झोपही लागत नाही.
शांत झोपेसोठी खरंतर आपल्याला हातपाय पसरता येतील असा बेड, उशी आणि पांघरूण हवं असतं. पण असे काही प्राणी जे उभ्या उभ्या अगदी शांत आणि नीट झोपतात.
गाढवांप्रमाणे घोडाही उभं राहून छानशी डुलकी घेतो. पण याचा अर्थ तो रात्रभरही तसाच झोपतो असं नाही. रात्री तो जमिनीवर आडवा होऊनच झोपतो.
उंच मान असलेला जिराफ, याची झोप कमी असते. शिवाय उंचीमुळे खाली जमिनीवर आडवं झोपून उठण्यात अडचण येते, त्यामुळेच तोसुद्धा उभ्यानेच झोपतो.
जिराफाप्रमाणे उंच असणारा उंटही उभ्याने झोपतो. तुम्ही उंटांना तसं आरामात झोपताना पाहिलं असेल पण ते उभं राहूनही झोपू शकतात.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हत्तीही उभ्या उभ्या झोपतात. पाळीव हत्ती जमिनीवर आडवे होऊन झोपतात. पण जंगली हत्ती मात्र उभं राहूनच झोप काढतात. हत्ती दिवसातून फक्त दोन तास झोपतात.
या प्राण्यांमध्ये स्थिर उभं राहण्याची आणि गुरुत्वाकर्षणालाही टक्कर देण्याची क्षमता असते. त्यामुळेच ते उभ्या उभ्या झोपू शकतात. (सर्व फोटो - Canva)